शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ, अनिल देशमुख म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 07:12 IST

अर्णब गोस्वामी व बार्कचे माजी मुख्य अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सॲप चॅटमधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्याने त्याविरुद्ध समाजमाध्यमातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

मुंबई : देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने गोपनीय असलेली माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी दिली. यामुळे गाेस्वामी यांच्या अडचणीत वाढ हाेण्याची शक्यता आहे.अर्णब गोस्वामी व बार्कचे माजी मुख्य अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सॲप चॅटमधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्याने त्याविरुद्ध समाजमाध्यमातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याप्रकरणी गोस्वामी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गृहमंत्री देशमुख यांच्याकडे केली. त्यानंतर त्यांनी उपरोक्त आश्वासन दिले.पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामी यांना घटनेच्या तीन दिवस आधीच होती, असे या संभाषणातून स्पष्ट होते. संरक्षणविषयक महत्त्वाची माहिती बाहेर येणे हे अत्यंत गंभीर असून लष्करी कारवाईसंदर्भातील माहिती बाहेर कशी आली, ती गोस्वामी यांना कारवाई होण्याच्या तीन दिवस आधी म्हणजे २३ फेब्रुवारी २०१९ रोजी कशी मिळाली, या सर्व प्रकारणाची चौकशी होणे गरजेचे आहे. गोस्वामी यांचे कृत्य गोपनीयतेचा कायदा भंग करणारे आहे. त्यावर कारवाईचे अधिकार राज्य सरकारला आहेत. त्यामुळे त्याला अटक करावी, त्यांच्या रिपब्लिक टीव्हीने अनेक बेकायदा कृत्य केली असून दूरदर्शनची सॅटेलाईट फ्रिक्ोन्शी बेकायदा वापरून प्रसार भारतीचे काेट्यवधी रुपयांचे नुकसान केले आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी सावंत यांनी केली. शिष्टमंडळात काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, गजानन देसाई, विनय खामकर आदी होते.

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीAnil Deshmukhअनिल देशमुखState Governmentराज्य सरकार