शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
5
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
6
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
7
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
8
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
9
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
10
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
11
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
12
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
13
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
14
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
15
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
16
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
17
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
18
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
19
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आरिफला ३० डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

By admin | Updated: December 18, 2014 05:33 IST

इसिस या अतिरेकी संघटनेत सक्रिय झालेला कल्याण येथील आरिफ माजिद याची चौकशी संपली असून, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत

मुंबई : इसिस या अतिरेकी संघटनेत सक्रिय झालेला कल्याण येथील आरिफ माजिद याची चौकशी संपली असून, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करावी, अशी मागणी करणारा अर्ज बुधवारी स्वत:हून राष्ट्रीय तपास यंत्रणेने विशेष न्यायालयात केला़ तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरिफला ३० डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली़आरिफच्या पोलीस कोठडीची मुदत २२ डिसेंबरला संपत असताना त्याआधीच एनआयएने स्वत: त्याला न्यायालयात हजर करून त्याची चौकशी संपली असल्याचे जाहीर केले़ विशेष न्यायाधीश यतीन डी़ शिंदे यांच्यासमोर आरिफला हजर करण्यात आले़ त्यावेळी त्याच्या वकिलाने ही अर्ज करून आरिफच्या नातेवाईकांना कारागृहात भेटू देण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली़ तसेच आरिफला काहीही कबूल करायचे नसून तो निर्दोष आहे, असा दावाही त्याच्या वकिलाने केला़ या अर्जाची न्यायालयाने नोंद करून घेतली़ मे महिन्यात धार्मिक यात्रेला गेलेला आरिफ व त्याचे मित्र अतिरेकी संघटनेत सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एकच खळबळ उडाली़ अखेर अरीबला भारतात आणायला गुप्तचर संघटनेला यश आले़