शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

MPSC परीक्षा देताय ? मग यशस्वीतेसाठी ही 5 वाक्ये माहिती असायलाचं हवीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2018 16:41 IST

पदवीधर झाल्यानंतर किंवा पदवीचे शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षा किंवा एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करताना अनेक विद्यार्थी दिसतात. त्यातच, विश्वास नांगरे पाटील, तुकाराम मुंडे, रमेश घोलप यांसारख्या...

मुंबई - पदवीधर झाल्यानंतर किंवा पदवीचे शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षा किंवा एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करताना अनेक विद्यार्थी दिसतात. त्यातच, विश्वास नांगरे पाटील, तुकाराम मुंडे, रमेश घोलप यांसारख्या युपीएससी पास अधिकाऱ्यांची भाषणे ऐकून आणि त्यांपासून प्रेरणा घेत हे विद्यार्थी अभ्यासाला सुरुवात करतात. मात्र, एमपीएससी किंवा युपीएससी परीक्षांची तयारी करताना रुममध्ये किंवा अभ्यासवर्गात विद्यार्थी काही अभ्यासाचे वेळापत्रक चिकटवतात. तर अनेकदा काही बोधवाक्येही लिहिलेली असतात. त्यामध्ये या पाच वाक्यांचा समावेश असायलाच हवा. 

स्पर्धा परीक्षांकडे सध्या तरुणाईचा कल वाढला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणही एमपीएससी आणि युपीएससी परीक्षांसाठी जीवाचे रान करताना दिसत आहेत. गावाकडून पुण्यात किंवा मुंबईत येऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करताना दिसतात. त्यासाठी स्पर्धा परीक्षांचे महागडे क्लासेसही लावले जातात. तर स्वतंत्र रुम करुन दिवसरात्र अभ्यास करतात. या अभ्यासाचे वेळापत्रकही विद्यार्थ्यांकडून तयार केले जाते. सोबतच, स्पर्धा परीक्षांमध्ये आदर्श असणाऱ्या अधिकाऱ्यांचे छायाचित्र रुममध्ये लावले जाते. तसेच काही कोट्स म्हणजे बोधवाक्येही रुममधील भिंतीवर चिकटवल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांच्या या बोधवाक्यात खालील पाच वाक्यांचाही समावेश असणे आवश्यक आहे. ज्येष्ठ साहित्यीक आणि लेखकांचे हे कोट्स नक्कीच विद्यार्थ्यांना प्रेरणा देतील. 

प्रेरणादायी 5 वाक्ये

* कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असाव लागतं. - व.पु.काळे* जे अश्यक्य वाटतयं ते स्वप्न मला पाहायचयं, ज्या शत्रूचा कुणी पराभव करु शकत नाही, अशा शत्रूला मला हरवायचयं - विश्वास नांगरे पाटील* शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही - बाबा आमटे* स्वप्न ते नव्हे जे तुम्हाला झोपल्यानंतर पडते, खरे स्वप्न तेच जे पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला सुखाने झोप लागत नाही - एपीजे अब्दुल कलाम* जो मुश्कील हालात मे नही तुटते, वो रेकॉर्ड तोड देते है - आयएएस रमेश घोलप

टॅग्स :Vishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटीलMPSC examएमपीएससी परीक्षाupscकेंद्रीय लोकसेवा आयोग