शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात धावत असलेल्या स्कूल बसेस ‘फिट’ आहेत का?; उच्च न्यायालयाची विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 10:23 IST

परिवहन आयुक्तांना मागितले उत्तर, मोटार वाहन कायद्यानुसार स्कूल बसेसची दरवर्षी फिटनेस तपासणी करणे बंधनकारक आहे.

नागपूर : कोरोनामुळे दोन वर्षे शाळा बंद होत्या. परिणामी, स्कूल बसेसची चाकेही थांबली होती. यावर्षी शाळा सुरू झाल्यामुळे स्कूल बसेस पुन्हा धावायला लागल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता या स्कूल बसेस ‘फिट’ आहेत का? अशी विचारणा परिवहन आयुक्तांना केली व यावर तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले.

मोटार वाहन कायद्यानुसार स्कूल बसेसची दरवर्षी फिटनेस तपासणी करणे बंधनकारक आहे. परंतु सध्या असंख्य स्कूल बसेस फिटनेस प्रमाणपत्राशिवाय रोडवर धावत आहेत. ही बाब विद्यार्थ्यांसाठी धोकादायक आहे. न्यायालयाने परिवहन आयुक्तांना यासंदर्भात चित्र स्पष्ट करण्यास सांगितले. राज्यात किती स्कूल बसेस आहेत, त्यापैकी किती स्कूल बसेसना फिटनेस प्रमाणपत्र जारी झाले आहे याची माहिती परिवहन आयुक्तांनी न्यायालयात सादर करायची आहे.

प्रकरणावर न्यायमूर्ती सुनील शुक्रे व गोविंद सानप यांच्यासमक्ष सुनावणी झाली. २०१२ मध्ये नागपूर येथील वीरथ झाडे या आठवर्षीय विद्यार्थ्याचा स्कूल बसखाली येऊन मृत्यू झाला होता. न्यायालयाने त्या घटनेची गंभीर दखल घेऊन स्कूल बस नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी ॲड. फिरदौस मिर्झा यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती करत वेळोवेळी अनेक महत्त्वाचे आदेश जारी केले.

शाळा समित्या, स्कूल बसथांब्यांचा मुद्दाही हाताळलाउच्च न्यायालयाने जिल्हास्तरीय व शाळास्तरीय स्कूल बस समित्या आणि स्कूल बस थांबे व पार्किंग हे मुद्देही विचारात घेतले, तसेच स्कूल बसेसकरिता नागपूरमध्ये किती ठिकाणी थांबे व पार्किंगची जागा निश्चित करण्यात आली, जिल्हास्तरीय स्कूल बस समितीच्या बैठका नियमित होत आहेत का आणि शाळास्तरीय स्कूल बस समित्या स्थापन झाल्या का, याची माहिती सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले.

‘लोकमत’ने वेधले होते लक्ष‘लोकमत’नेही गेल्या २५ जून रोजी बातमी प्रकाशित करून शहर व ग्रामीण भागातील एकूण १ हजार ९८ स्कूल बसेसकडे फिटनेस प्रमाणपत्रच नाही, याकडे लक्ष वेधले होते, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली होती.  संबंधित स्कूल बसेसमध्ये शहरातील ७२३ तर, ग्रामीणमधील ३७५ स्कूल बसेसचा समावेश आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय