शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात मालिकांमध्ये काम देण्याच्या बहाण्याने महिलांचे पोर्टफोलिओ तयार करून पैसे उकळणाऱ्या आर्किटेक्टला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 10:32 IST

 निर्माता आणि दिग्दर्शक असल्याची बतावणी करून अनेक महिलांना गंडा घालणाऱ्या सराईत आरोपीलाला गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने अटक केली. पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात बॅचलर ऑफ आर्किटेकचे त्याचे शिक्षण झाले आहे.

ठळक मुद्दे निर्माता आणि दिग्दर्शक असल्याची बतावणी करून अनेक महिलांना गंडा घालणाऱ्या सराईत आरोपीलाला गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने अटक केली. पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात बॅचलर ऑफ आर्किटेकचे त्याचे शिक्षण झाले आहे.

पुणे-  निर्माता आणि दिग्दर्शक असल्याची बतावणी करून अनेक महिलांना गंडा घालणाऱ्या सराईत आरोपीलाला गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने अटक केली. पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात बॅचलर ऑफ आर्किटेकचे त्याचे शिक्षण झाले आहे. हा आर्किटेकट नाशिक, मुंबई, कोल्‍हापूरसह गोव्यातील महिला आणि छायाचित्रकारांशी गोड बोलून त्यांची फसवणूक करीत होता.

संदीप महादेव व्‍हरांबळे ऊर्फ संदीप पाटील ऊर्फ सॅण्‍डी (वय ३२) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तो मूळचा कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील कागल तालुक्यातील हळदी येथील असून सध्या नवी मुंबईत राहतो. जस्ट डायलवरून महिलांचे फोन नंबर घ्यायचा आणि फेसबुक व सोशल नेट्वर्किंगवरून फोटोग्राफर आणि मॉडेल होण्यास इच्छुक असणाऱ्या तरुणांची माहिती घेऊन त्यांच्याशी संपर्क करायचा तसेच तरुणींचे फोटो शूट करायचे आहे तुम्ही किती पैसे घेता अशी फोटोग्राफरला विचारणा करून मॉडेलचे फोटो शूट करून घ्यायचा,महिलांना फोटो शूट करण्याचे आमिष दाखवायचा आणि पसार व्हायचा अशाप्रकारे महिला आणि छायाचित्रकाराना त्यांने गंडा घातला. 

गुन्हे शाखेच्या युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक नितीन भोसले-पाटील यांना याच्याबाबात माहिती मिळाली. त्यानुसार, अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन भोसले-पाटील व त्यांच्या पथकाने अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या सहकार्याने संदीप व्हरांबळे याला नाशिक येथून सापळा रचून अटक केली. दरम्यान अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.