शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
2
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
3
शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याला पुन्हा भाव! मात्र, चांदी घसरली; आजचे दर काय?
4
युद्धाचा भडका उडणार, अमेरिका 'या' देशात सत्तांतर घडवण्याच्या तयारीत?; विमाने रद्द, युद्धनौका, लढाऊ विमाने तैनात
5
IND vs SA : कोण आहे Senuran Muthusamy? कसोटी पदार्पणात 'विराट' विकेट; भारताशी खास कनेक्शन अन् बरंच काही
6
४०व्या वर्षी दुसऱ्या बाळाला जन्म देणार सोनम कपूर, हटके मॅटर्निटी फोटोशूटने वेधलं लक्ष
7
कर्मचारीहिताचा मोठा निर्णय! 'गिग वर्कर्स'नाही मिळणार PF-ग्रॅच्युइटी; नवीन लेबर कोडचे ३ महत्त्वाचे फायदे!
8
टॉर्चर अन् चॅटिंगने १० महिन्यातच संपवला संसार; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणात गूढ वाढले
9
काळाचा घाला! नैनीतालमध्ये भीषण अपघात, खोल दरीत पडली कार; तिघांचा मृत्यू, १ जखमी
10
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
11
टीम इंडियावर वनडेत नवा कर्णधार शोधण्याची वेळ! कोण घेणार शुभमन गिलची जागा?
12
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांवर टांगती तलवार; सुप्रीम कोर्टात काय होईल? इच्छुकांची घालमेल
13
VIDEO: हरलेल्या संघाच्या कॅप्टनला विचारलं- "जिंकल्यावर कसं वाटतंय?"; चूक लक्षात येताच....
14
"तू आई-वडिलांना छोट्या गोष्टी..."; फिजिओथेरपिस्टचा होणाऱ्या नवऱ्याला मेसेज, का संपवलं आयुष्य?
15
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
16
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
17
VIDEO: तुझे लागे न नजरिया... श्रेयंका अन् जेमिमाचा 'टीम इंडिया'च्या पोरींसोबत भन्नाट डान्स
18
नाशिक: तस्कर टोळीतील एकाने वनपथकाच्या हाती दिल्या तुरी; बाऱ्हे वनविश्रामगृहातून ठोकली धूम
19
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
20
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
Daily Top 2Weekly Top 5

औषध खरेदीत मनमानी

By अतुल कुलकर्णी | Updated: March 27, 2018 04:54 IST

कोणत्याही विभागाला लागणारी औषध खरेदी हाफकिन औषध खरेदी महामंडळातर्फे केली जावी,

मुंबई : कोणत्याही विभागाला लागणारी औषध खरेदी हाफकिन औषध खरेदी महामंडळातर्फे केली जावी, असा शासन आदेश असताना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्हा शल्यचिकित्सकांनी मनमानी औषध खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे औषध खरेदीत सुसूत्रता येण्याऐवजी सगळा सावळा गोंधळ सुरू झाला आहे.कोणत्याही विभागाला औषधांची गरज लागली, तर त्यांनी त्यांची मागणी आपापल्या विभागांकडे नोंदवावी. विभागांनी मागणी एकत्रित करून हाफकिनकडे नोंदवावी. त्यानंतर, महामंडळाने पुढची प्रक्रिया पूर्ण करून, संबंधित विभागांना ती औषधी उपलब्ध करून द्यावीत, असा शासन आदेश आहे. मात्र, अनेक जिल्हा शल्यचिकित्सक परस्पर निविदा काढून औषध खरेदी करत आहेत. आरोग्य विभागाने १२ निविदा परस्पर काढल्या असून, त्या शासनाच्या महाटेंडर्स या साइटवर उपलब्ध आहेत.या खरेदीचे काही भयंकर प्रकार समोर आले आहेत. हाफकिनने २३ डिसेंबर २०१७ रोजी १३,५०,९४६ अँटिरेबीज व्हॅक्सिनची खरेदी करण्याचे आदेश काढले. ही खरेदी संपूर्ण राज्यासाठी होती. मात्र, १२ मार्च २०१८ रोजी अमरावतीच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी स्वत:च्या अधिकारात २ हजार व्हॅक्सिनच्या खरेदीचे टेंडर काढले. त्यामुळे केलेली खरेदी अमरावतीला पोहोचली नाही का, अमरावतीने त्यांची मागणी नोंदविली होती का, या व्हॅक्सिनचे राज्यासाठी व अमरावतीसाठी आलेले दर काय आहेत, जर दर वेगवेगळे आले, तर होणाºया नफा नुकसानीची जबाबदारी कोणाची, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.असाच प्रकार बीडच्या जिल्हा शल्यचिकित्सकांनी केला. हाफकिनने ८ डिसेंबर रोजी ८० ब्लड स्टोरेज कॅबिनेटची खरेदी केली. मात्र, २० फेब्रुवारी रोजी २ ब्लड स्टोरेज कॅबिनेट खरेदीचे टेंडर काढले. हाफकिनने ८ बेरा विथ एएसएसआर विथ इन्सर्ट फोन अँड हेड फोनच्या खरेदीचे आदेश २० डिसेंबर रोजी काढले, पण वर्धा जिल्हा शल्यचिकित्सकांनी एका मशिनसाठी ६ मार्च २०१८ रोजी स्वतंत्र टेंडर काढले आहे. हाफकिनने आयव्ही डेक्स्ट्रोज ५% या ५०० एमएलच्या ९लाख ६८हजार ८३१ बाटल्या खरेदी करण्याची प्रक्रिया २४ नोव्हेंबर २०१७ रोजी सुरू केली, तर अमरावतीच्या जिल्हा शल्यचिकित्सकांनी याच्या १५ हजार बाटल्यांचे टेंडर काढले. याबाबत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना संपर्क साधला असता, ते उपलब्ध झाले नाहीत.