शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

एप्रिल ठरेल महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हीट, सर्वोच्च न्यायालयात चार प्रमुख याचिकांवर होणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 6:07 AM

खासदार नवनीत राणा प्रकरणासह शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ५ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित चार महत्त्वाच्या प्रकरणांसाठी एप्रिल महिना महत्त्वाचा ठरणार आहे. होळीच्या सुट्ट्यांनंतर न्यायालयाच्या कामकाजाला १ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. खासदार नवनीत राणा प्रकरणासह शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ५ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

अर्थात, ही संभाव्य तारीख असून त्यात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमदार अपात्रता (सुनील प्रभू विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) प्रकरणाची सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठापुढे ७ मार्च रोजी सुनावणी झाली होती. त्यावेळी नार्वेकर यांच्यापुढे सादर करण्यात आलेला मूळ दस्तावेज मागवून घेताना पुढची सुनावणी ८ एप्रिलला ठेवली होती. या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात व्हावी की सर्वोच्च न्यायालयात हा मुद्दा खुला ठेवण्यात आला आहे.  

शरद पवार गटाला स्पष्टीकरण मागण्याची संधीसर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून लेखी हमी घेतल्यानंतरही निवडणूक प्रचारात शरद पवार यांचे छायाचित्र आणि नाव वापरले जात असल्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन आणि अवमान केल्याबद्दल शरद पवार गटाला न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्या. के. व्ही. विश्वनाथन यांच्या पीठाकडे स्पष्टीकरण मागता येईल.

१९ एप्रिल - शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी : निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव व चिन्हाविषयी दिलेल्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर वरील पीठापुढे १९ एप्रिलला सुनावणी होणार आहे.१६ एप्रिल - ओबीसी आरक्षण : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण देण्याच्या प्रकरणी  १६ एप्रिलला सुनावणी होईल. १ एप्रिलनंतर - नवनीत राणा जात प्रमाणपत्र प्रकरण : खासदार नवनीत कौर राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यावर न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि न्या. संजय करोल यांनी राखून ठेवलेला निकाल १ एप्रिलनंतर कधीही लागण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयPoliticsराजकारण