शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्तीच वादग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 05:49 IST

काँग्रेसने उपस्थित केले अनेक प्रश्न; निवडणूक आयोग दबावाखाली काम करत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याच्या विद्यमान मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने विधानसभा निवडणूक काळात सोशल मीडियाचे कंत्राट भाजपशी संबंधित कंपनीला दिले होते. यावर काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नांंना निवडणूक आयोगाने दिलेले उत्तर हे पूर्णपणे असमाधानकारक असल्याचे सांगत काँग्रेस पक्षाने आता राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या नियुक्ती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे.मुख्य निवडणूक अधिकाºयांच्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्णपणे संशयास्पद असून केंद्रीय निवडणूक आयोग दबावाखाली काम करत आहे का, अशी विचारणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती सदर पदावर जुलै २०१९ मध्ये झाली होती. त्याअगोदर ते प्रतिनियुक्तीवर केंद्र सरकारच्या सेवेत मुंबईतील अंधेरी येथील सीप्झ येथे विशेष आर्थिक क्षेत्राचे विकास आयुक्त म्हणून कार्यरत होते. या कार्यकाळात गैरव्यवहाराच्या तक्रारी आल्यानंतर ११ मे २०१८ रोजी केंद्रीय दक्षता आयोगाने वाणिज्य मंत्रालयाला त्यांच्या विरोधात चौकशी करण्याचे आदेश दिले. महालेखापालांनी जून २०१८ रोजी केलेल्या लेखापरीक्षणात ताशेरे ओढले आहेत.राज्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणतात...हा सगळा प्रकार अत्यंत क्लेशदायक व दु:खदायक आहे, ज्याचा निवडणूक निर्णय अधिकाºयांशी संबंध नाही. ज्या पद्धतीने मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे तो अत्यंत दु:खी आणि दिशाभूल करणारा आहे. हे पूर्णपणे खोटे आणि चुकीचे आरोप आहेत. जे आक्षेप नोंदवण्यात आले आहेत ती कामे विद्यमान निवडणूक निर्णय अधिकारी सीप्झमध्ये रुजू होण्याच्या आधीची आहेत. सीप्झ हे केंद्र सरकारचे महामंडळ आहे. यासंबंधीची सगळी माहिती या आधीच्या सरकारमधील सक्षम अधिकाºयांना देण्यात आली आहे. जे पत्र आरोपादाखल दिले जात आहे ते नीट वाचले तर ही वस्तुस्थिती लक्षात येईल. विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नाव सरकारच्या या पत्रामध्ये नाही आणि विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी एसईपीझेडमध्ये सामील होण्यापूर्वीच ही सर्व कामे व एजन्सीची नियुक्ती झाली होती. - राज्य निवडणूक अधिकारी

टॅग्स :Electionनिवडणूक