शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससीच्या नियुक्त्या पंधरा दिवसांत; शासन निर्णय निघाला, १७ जणांना नेमणूकपत्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 09:19 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या पदभरती विहित वेळेत केल्या जाव्यात तसेच या प्रक्रिया एका ठरावीक कालबध्द वेळेत करण्यासंदर्भात विनय कोरे यांनी प्रश्न उपस्थित केला.

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०१९ मध्ये कर सहाय्यक आणि लिपिक-टंकलेखक पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना येत्या पंधरा दिवसांत नियुक्ती देण्यात येईल, असे आश्वासन सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंगळवारी विधानसभेत दिले.महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या पदभरती विहित वेळेत केल्या जाव्यात तसेच या प्रक्रिया एका ठरावीक कालबध्द वेळेत करण्यासंदर्भात विनय कोरे यांनी प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत आमदार चंद्रकांत पाटील, प्रकाश आबिटकर, नाना पटोले, योगेश सागर यांनी भाग घेतला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट ‘क’ मध्ये सन २०१९ मध्ये कर सहायक, लिपिक टंकलेखक व दुय्यम निरीक्षक या पदांसाठी पदभरती प्रक्रिया वेगवेगळ्या कारणांमुळे प्रलंबित आहे आणि आश्वासन देऊनही नियुक्ती दिली जात नसल्याचे सदस्यांनी सांगितले.राज्यमंत्री भरणे म्हणाले की, भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासन निर्णय काढला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर २०२० रोजी अंतरिम आदेशान्वये एसईबीसी आरक्षणासह स्थगिती दिली होती. तर कर सहायकांची १२६ आणि लिपिक टंकलेखकाच्या १७९ पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना पंधरा दिवसांत नियुक्ती देण्यात येण्याबाबत तसेच ३३ दुय्यम निरीक्षक मधील १७ जणांना नेमणूक पत्रे दिली असून उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून सर्वांच्या वेळेत नेमणुका करण्यात येतील.सेतू सुविधा केंद्रासाठी लवकरच निविदाराज्यातील बंद असलेली सेतू सुविधा केंद्रे सुरू करण्यासाठी येत्या तीन महिन्यांत निविदा काढण्यात येतील, असे आश्वासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंगळवारी विधानसभेत दिले. तर सेतू केंद्र वेळेत सुरू करण्याबाबत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.काँग्रेसचे धीरज देशमुख यांनी लातूर जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये ३१ डिसेंबरपासून एकात्मिक नागरी सेतू केंद्र बंद असल्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी राजेंद्र पाटणी, नमिता मुंदडा, आशिष जयस्वाल, श्वेता महाले यांनीही प्रश्न उपस्थित केले. नमिता मुंदडा यांनी बीड जिल्ह्यातील ११ सेतू केंद्रे बंद असल्याचे सांगत ही केंद्रे कधी सुरू करणार असा प्रश्न विचारला. राजेंद्र पटणी यांनीही हा मुद्दा उचलून धरत सेतू केंद्रांची मुदत संपणार आहे, हे जिल्हाधिकाऱ्यांना माहीत होते. तरीही त्यांनी कार्यवाही केली नाही. त्यामुळे प्रशासनाने केवळ चालढकल करत सामान्य नागरिकांना त्रास दिला आहे. कोरोना काळात केंद्रांना मुदतवाढ दिली हे मान्य करू पण त्यानंतर काहीच जबाबदारी नाही का? असा प्रश्न विचारला. श्वेता महाले आणि आशिष जयस्वाल यांनीही संबधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावू. तसेच दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे भरणे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा