शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
11
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
12
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
13
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
14
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
15
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
16
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
17
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
18
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
19
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
20
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन

‘राज्याचेच हाऊसिंग रेग्युलेटर लागू करा’

By admin | Updated: November 19, 2015 02:50 IST

केंद्र शासनाचे गृहनिर्माण धोरण येईपर्यंत महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेले गृहनिर्माण नियामक ( हाऊसिंग रेग्युलेटर) तातडीने अंमलात आणावे, असा प्रस्ताव गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी

- अतुल कुलकर्णी,  मुंबईकेंद्र शासनाचे गृहनिर्माण धोरण येईपर्यंत महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेले गृहनिर्माण नियामक ( हाऊसिंग रेग्युलेटर) तातडीने अंमलात आणावे, असा प्रस्ताव गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळे हाऊसिंग रेग्युलेटरचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात आहे.राज्याचा मंजूर कायदा तातडीने अंमलात आणल्यास मध्यमवर्गीयांचे घराचे स्वप्न सुकर होईल. पण सरकार बिल्डरांच्या दबावाखाली असल्याने हा कायदा मंजूर केला जात नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले हाऊसिंग रेग्युलेटर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतरही दीड वर्षापासून पडून आहे. नवा मंजूर झालेला कायदा अमलात येत नाही आणि जुन्या ‘मोफा’ कायद्यातल्या पळवाटांचा फायदा घेत फ्लॅट विकत घेणाऱ्यांना नाडले जात असल्याची अनेक उदाहरणे आहेत. ठाण्यातील सात मजली कोसळली तेव्हाही नवा कायदा मंजूर होता, पण अंमलबजावणी सुरू झाली नव्हती. परिणामी जुन्या कायद्यातल्या तुटपुंजा शिक्षेचा फायदा त्या बिल्डरांना मिळाला. केंद्र सरकारने नेमलेली खासदारांची समिती मुंबईत आली होती. मात्र दिल्लीत जाऊन त्यांनी राज्याचा कायदा रद्द करा आणि केंद्राचा अमलात आणा, अशी शिफारस केल्याने या विषयावर चर्चा करून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. दरम्यानच्या काळात मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी यासंबंधीची फाइल गृहनिर्माण मत्र्यांकडे पाठवली होती. केद्र सरकार कायदा आणणार आहे. त्यामुळे आपण मंजूर केलेल्या कायद्याबाबतचा निर्णय सरकारने घ्यायचा आहे. याबाबत मार्गदर्शन करावे, अशी विचारणा करणारी फाइल महेता यांच्याकडे आली. त्यावर आपलाच कायदा लागू करावा, अशी शिफारस करून महेता यांनी ती मुख्यमंत्र्यांकडे पाठवली आहे.केंद्राला विरोध केंद्राचा कायदा दीर्घकाळासाठी लांबणीवर पडल्याची चिन्हे आहेत. केंद्राने केलेल्या कायद्याबाबत काँग्रेस, ममता बॅनर्जी आणि डाव्या पक्षांनी तीव्र विरोध केला आहे. राज्यसभेत सरकारचे बहुमत नाही, त्यामुळे केंद्राचा कायदा नजिकच्या दोन वर्षात तरी येणे अशक्य आहे.