शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

'पीडितेला न्याय देण्यासाठी धर्माधिकारी समितीच्या शिफारशी लागू करा'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 8:35 PM

दिल्लीतील निर्भयाच्या घटनेनंतर तत्कालीन महाराष्ट्र सरकारने माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर

मुंबई : महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. वर्धा, संभाजीनगर येथे तर भरदिवसा महिलेला जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. यातील वर्धा आणि संभाजीनगर येथील पिडितेचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. आपण अतिसंवेदनशील पणे गृहविभागास महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पावले उचलण्याबाबत निर्देश दिले असल्याबाबत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे आभार मानले.

दिल्लीतील निर्भयाच्या घटनेनंतर तत्कालीन महाराष्ट्र सरकारने माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महिलांवरील अत्याचार रोखण्यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल १७ जानेवारी २०१३ रोजी शिफारशीसह गृह विभाग प्रधान सचिव यांच्याकडे सोपविण्यात आला होता. यातील काही शिफारशी स्विकार शासन स्तरावर झाला असला तरी देखील बऱ्याच शिफारशींची प्रत्यक्षात  अंमलबजावणी झाली नसल्याचे समोर आले आहे. उर्वरित शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनास देण्यात यावे असे या मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.  मुळ अहवालच्या (१७ जाने २०१३) व शेवटच्या शिफारशी (१५ नोव्हेंबर २०१४ ) प्रति देखील ना.डॉ.गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.

तसेच१. मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून पिडितेला आर्थिक मदत केली जाते. सध्या मदत ही विधी प्राधिकरणच्या मार्फत देण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. असे असले तरी देखील पिडीतेला सध्याही शासनाच्या अधिकारी यांच्या हाताकडे पाहावे लागत आहे. कधी पोलीस प्रशासन यांच्याकडून प्रस्ताव उशिरा जातो तर कधी विधी प्राधिकरण अधिकारी यांना वेळ नसतो. यामुळे पिडितेला मदत निधी वितरीत करण्यासाठी विविक्षीत कालावधीत करून देण्यात यावा. तसेच यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त किंवा अधीक्षक आणि जिल्हा सरकारी वकील यांची समिती स्थापन करून त्यांना आर्थिक मदत देण्याचे अधिकार देण्याची विनंती देखील मुख्यमंत्री उद्धवजी यांना ना.डॉ.गोऱ्हे यांनी केली आहे.

२.  बालक बालिका तथा किशोरवयीन मुलींवर होणारी छेडछाड, हल्ले, अपहरण, बलात्कार, खून, कौंटुबिक हिंसाचार,कामाच्या ठिकाणी शोषण, सायबर गुन्हे याबाबत प्रतिबंधक उपाययोजना व  दोषसिध्दीचे प्रमाण वाढविण्याबाबत आवश्यक पाऊले उचलण्याबाबत महिन्यातून दोनदा तरी अहवाल आपल्या स्तरावरून घेण्यात यावा.यात बलात्कार व बाललैंगिक शोषणाच्या घटनात चार्जशीट सर्व केसेसमध्ये दाखल झाली कां? मनोधैर्य योजनेची मदत त्वरीत मिळण्यावर भर तसेच महाराष्ट्रातील घडलेल्या केसेस पैकी कोणत्याही काही  (Radium case Monitoring System) केसेसच्या मुलींना काय अडचणी येतात हे तपासून कार्यवाही सुचना सुरु कराव्यात. (Radium Monitoring System) यातुन सर्व यंत्रणेला हुरुप व गती येईल. या काही केसेससाठी माहिती, मदत व  वस्तुस्थिती आकलनासाठी साठी व ना.डॉ.गोऱ्हे व उपसभापती कार्यालय हे काम विधायक व सुप्रशासनाचा भाग असल्याने सहकार्य करण्याची इच्छा देखील यावेळी ना.डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केली. 

३. "स्त्रीविषयक गुन्हयांमध्ये संवेदनशिल पध्दतीने नोंद करणे व त्यासाठी पोलीसांना विविध महिला विरोधात होणाऱ्या हिंसाचार गुन्हे निहाय मार्गदर्शक सुचना (SOPs) तयार करण्याबाबत निर्देश देऊन पिडीत महिलेला न्याय देण्यात यावा. या कामासाठी स्त्री आधार केंद्र लिखित पोलीस मार्गदर्शक या पुस्तकाचा ऊपयोग करण्यात यावा अशी सूचना मांडण्यात आली असल्याचे निवेदन नमूद केले आहे. 

४. "CCTNS कार्यप्रणाली  संदर्भात सद्य:स्थिती व आढावा" घेऊन अधिक कशा प्रकारे सक्षम करता येईल यादिशेने पावले उचलण्यात यावीत. 

५. त्याचबरोबर "महिला पोलीस कक्ष,भरोसा सेल व महिला दक्षता समित्या,सामाजिक संघटनांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने प्रशासनास सूचना देण्यात यावी.गेली १० वर्षात या बैठकांची मिनीटस पुढील बैठकीत देऊन झालेली कार्यवाही सांगण्यात येत नाही व त्यांच्या नावाचे फलकही पोलीस स्टेशनच्या आत माहितीस्तव लावलेले नसतात. याबाबत निर्णय घेण्यात यावा अशी सूचना देण्यात आली. 

६. तसेच गुन्हे विषयक महाराष्ट्र पोलीसांचा २०१८ चा अहवाल  (सीआयडी,) प्रलंबित आहे. त्यामुळे २०१८ आणि २०१९ चा लवकरत लवकर तयार करण्यात यावा. यातून महाराष्ट्रातील गुन्ह्याबाबतची सद्यस्थित समोर आल्यास पावले उचलणे शक्य होऊ शकले. सदरील अहवाल तत्काळ तयार करून जाहीर करण्याची सूचना प्रशासनास देण्यात यावी अशा मागणी ना.डॉ.गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री यांना सदरील निवेदनाद्वारे केली आहे. 

टॅग्स :MumbaiमुंबईRapeबलात्कारHinganghatहिंगणघाटUddhav Thackerayउद्धव ठाकरेNeelam gorheनीलम गो-हे