मुंबई : राज्यातील मराठा समाजाला शिक्षणात, तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण देण्यासंबंधीची अधिसूचना महाराष्ट्र सरकारने शनिवारी जारी केली असून, त्यामुळे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गात या समाजाला हे आरक्षण तत्काळ लागू झाले आहे.शिक्षणातील आरक्षण हे सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये लागू असेल. त्यात अनुदानित, विनाअनुदानित, खासगीसह सर्व संस्थांचा समावेश आहे. नोकºयांमधील आरक्षण सरकारी व निमसरकारी कार्यालये, महामंडळे, महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याखाली स्थापन केलेल्या आणि ज्यात राज्य सरकार भागधारक आहे, अशा सर्व सहकारी संस्था, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आदी स्थानिक स्वराज्य संस्था यासह सर्व सरकारी नोकºयांत तत्काळ लागू झाले आहे.मराठा समाजाला हे आरक्षण देताना अस्तित्वात असलेल्या अन्य प्रवर्गांच्या कोणत्याही आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही, असे राज्य सरकारच्या अधिसूचनेतही स्पष्ट करण्यात आले आहे.वैद्यकीय, तंत्र व शिक्षण क्षेत्रातील अतिविशेषीकृत पदे, बदलीद्वारे किंवा प्रतिनियुक्तीद्वारे भरावयाची पदे, ४५ दिवसांपेक्षा कमी कालावधीच्या तात्पुरत्या नियुक्त्या आणि कोणत्याही संवर्गातील किंवा श्रेणीतील एकमेव पद यांना मात्र आरक्षण लागू नसेल. राज्याच्या अनुसूचित क्षेत्रात अनुसूचित जमातींच्या उमेदवारांसाठी राखीव असलेल्या पदांना वरील आरक्षण लागू राहणार नाही.शिक्षण आणि नोकºयांमध्ये खुल्या प्रवर्गातही मराठा समाजातील विद्यार्थी, तसेच उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे संधी मिळू शकेल, असे ही अधिसूचना सांगते. त्यांना खुल्या प्रवर्गात संधी मिळाल्याच्या कारणास्तव या समाजासाठी असलेले १६ टक्के आरक्षण कमी करण्यात येणार नाही. या समाजाच्या म्हणजेच एसईबीसी प्रवर्गाच्या व्यक्तींसाठी राखीव असलेली कोणतीही जागा रिक्त राहिल्यास, पाच वर्षे त्या पदावर अन्य प्रवर्गातील व्यक्तीची निवड केली जाणार नाही.केंद्रीय किंवा राज्य कायद्यांद्वारे निर्माण केलेली राज्याच्या मालकीची मंडळे व महामंडळांमध्ये आरक्षण लागू असेल, पण आयएएस, आयपीएससह केंद्र सरकारच्या कोणत्याही नोकºयांमध्ये हे आरक्षण लागू होणार नाही.अधिसूचनेवरून हे स्पष्ट होते की शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या जातींसाठी हे आरक्षण आहे. त्यामुळे काळाच्या ओघात व योग्य प्रक्रियेद्वारे ज्या समाजांचे मागासलेपण सिद्ध होईल, अशा मराठा समाजाखेरीजच्या अन्य जातींनाही या आरक्षणाचा भविष्यात फायदा मिळू शकतो, असा अर्थ लावण्यात येत आहे.।क्रिमीलेअरची असेल अटमराठा समाजाला नोकºया, तसेच शिक्षणाच्या आरक्षणासाठी क्रिमीलेअरची मर्यादा असेल. म्हणजेच क्रिमीलेअरमधील उमेदवार वा विद्यार्थ्यांनाच या आरक्षणाचा फायदा दिला जाईल.
महाराष्ट्रात मराठा आरक्षण लागू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 06:41 IST