शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
5
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
6
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
7
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
8
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
9
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
10
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
11
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
12
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
13
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
14
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
15
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
16
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
17
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
18
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
19
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बालगृहात सीसीटीव्ही बसवा

By admin | Updated: June 11, 2015 02:11 IST

बालगृहात गुटखा व तंबाखू पुरवले जात असल्याचा धक्कादायक अहवाल प्रधान दंडाधिकारी (ज्युएनाइल जस्टिस बोर्ड) यांनी उच्च न्यायालयात सादर केला आहे

मुंबई : बालगृहात गुटखा व तंबाखू पुरवले जात असल्याचा धक्कादायक अहवाल प्रधान दंडाधिकारी (ज्युएनाइल जस्टिस बोर्ड) यांनी उच्च न्यायालयात सादर केला आहे. या अहवालाची दखल घेत न्यायालयाने राज्यातील सर्व निवारागृहे व बालगृहामंध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश राज्य शासनाला दिले आहेत.माटुंगा येथील डेव्हीड ससून बालगृहात एका अल्पवयीन मुलाचा कोठडीत मृत्यू झाला होता. त्याची दखल घेत न्यायालयाने बालगृहांच्या सद्य:स्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश बोर्डाला दिले होते. त्यानुसार न्या. व्ही. एम. कानडे व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर याचा अहवाल सादर करण्यात आला. बालगृहातील मुलांचा लैंगिक छळ होतो. तेथे गुटखा व तंबाखूही पुरवले जात असल्याची धक्कादायक माहिती या अहवालातून समोर आली. त्यामुळे बालसुधारगृहांवर लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले.महानगर दंडाधिकारी यांनी ज्युएनाइल बोर्डाला प्रौढ आरोपींच्या गुन्ह्याची दखल घेण्याचेही आदेश दिले असल्याचे या अहवालातून न्यायालयासमोर आले. मात्र बोर्डाकडे केवळ अल्पवयीन मुलांच्या गुन्ह्यांची दखल घेऊ शकते. त्यामुळे महानगर दंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाबाबतही खुलासा होणे आवश्यक आहे, असेही खंडपीठाने नमूद केले आहे. या अहवालाची दखल घेत मुंबई व उपनगरांतील सर्व निवारागृहे व बालगृहांनी तेथील सद्य:स्थितीचा अहवाल सादर करावा. मुलींना ठेवण्यात आलेल्या बालगृहात केवळ महिला अधिकारी व सुरक्षारक्षकाचीच नेमणूक करावी, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.अल्पवयीन आरोपींना बोर्डासमोर हजर न केल्याने तीन ते सहा महिन्यांपासून ते सुधारागृहातच असल्याचा मुद्दादेखील अहवालात नमूद करण्यात आला आहे. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने जामीनपात्र गुन्ह्यात अटक अल्पवयीन आरोपींची तत्काळ जामिनावर सुटका करण्याचे आदेश बोर्डाला दिले आहेत.