शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात चिंताच; नाशिकची परिस्थिती सुधारली; विदर्भ आणि कोकणात मुसळधार पाऊस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 07:05 IST

कही खुशी : ४८ तासांत धरणांच्या साठ्यात आठ टक्के वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या दोन दिवसांत विदर्भ, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पडत असलेल्या पावसाने राज्यातील एकूण १३८ मोठ्या धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली असून काही धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांत एकूण पाणीसाठ्यात आठ टक्के वाढ झाली आहे. मराठवाड्याचे चित्र आशादायी नसून धरणसाठ्यात कसलीही वाढ झालेली नाही.

गतवर्षी आजच्या तारखेला राज्यातील एकूण धरणांत ५४.५६ टक्के साठा होता, तर यंदा तो ४५.०८ टक्के झाला आहे.मराठवाड्याला पाण्याची गरज

■ कोकण, पुणे आणि नागपूर विभागांतील धरणे पन्नास टक्क्यांच्यावर गेली असताना छत्रपती संभाजीनगर विभागात १२.६६ तर नाशिक विभागात ३४.६८ टक्के साठा आहे.

■ दोन दिवसांत पडलेल्या पावसाने नाशिकची स्थिती सुधारली आहे. नाशिक विभागात चांगला पाऊस झाल्यास गंगापूर धरणातून जायकवाडीत पाणी सोडले जाऊ शकते. ■ अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाचा साठा साठ टक्क्यांच्या वर गेल्याने विसर्ग केल्यास मराठवाड्यातील जायकवाडी धरणाची पातळी वाढण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

• नाशिक विभागातील भावली (९६ टक्के), दारणा (७४ टक्के), गंगापूर ४२ टक्के, कडवा (६४ टक्के) आणि वैतरणा प्रकल्पात ४८.५२ टक्के साठा आहे. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण ६३ टक्के भरले आहे.

सर्वात जास्त कोकण विभागातसर्वात जास्त कोकण विभागात ७३ टक्के पाणीसाठा झाला आहे. नागपूर विभागात ५६% पाणीसाठा असून तीन धरणे शंभर टक्के भरली आहेत. पुणे विभागातील ३५ धरणांत ५२% पाणीसाठा झाला असून १८ धरणांमधील पातळी ६० टक्क्यांच्यावर गेल्याने विसर्ग सोडण्यात येत आहे.

खडकवासला, राधानगरी, कुंडली ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. तरीही उजनी आणि जोगे धरण अद्याप मायनसमध्ये आहे. कोकणातील ११ धरणांपैकी तीन धरणे शंभर टक्के भरली असून बहुतांशी धरणांत ६० टक्केच्यावर साठा आहे.

टॅग्स :Rainपाऊस