शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
2
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
3
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
4
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
5
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
6
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
7
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
8
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
9
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
10
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
11
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
12
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
13
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
14
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
15
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
16
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
17
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
18
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
19
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
20
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना

उपराजधानीला कॅन्सरचा विळखा

By admin | Updated: February 4, 2015 01:00 IST

भारतात इतर राज्याच्या तुलनेत नागपुरात कॅन्सरसारखा जीवघेणा आजार झपाट्याने वाढत आहे. विशेषत: देशात स्तनाच्या कॅन्सरमध्ये नागपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर अहमदाबाद आहे.

स्तनाच्या कॅन्सरमध्ये देशात नागपूर दुसऱ्या स्थानी सुमेध वाघमारे - नागपूरभारतात इतर राज्याच्या तुलनेत नागपुरात कॅन्सरसारखा जीवघेणा आजार झपाट्याने वाढत आहे. विशेषत: देशात स्तनाच्या कॅन्सरमध्ये नागपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर अहमदाबाद आहे. नागपुरात प्रत्येकी एक लाख लोकांमध्ये १०७ महिला तर ९७ पुरुष कॅन्सरच्या विळख्यात आहे. यातील अनेक रुग्ण मृत्युपंथाला जात असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती आहे.राज्यातील मुंबई, पुणे आणि औरंगाबाद या शहराच्या तुलनेत नागपुरात कॅन्सर रुग्णांची संख्या अधिक असून त्यात वाढ होत आहे. या शहरांमधील वैद्यकीय यंत्रसामग्री, उपकरणांचा तुलनात्मक अभ्यास केला तर नागपूरची परिस्थिती भयावह आहे. केंद्राने अलीकडेच देशातील आरोग्यसंबंधीचा अहवाल प्रकाशित केला आहे. त्यानुसार मुंबईच्या लोकसंख्येचा विचार केला तर एकट्या राजधानीत २२ हजार ८६४ कॅन्सर रु ग्णांची नोंद होत आहे. नागपुरात हेच प्रमाण ४३००, पुण्यात ५९२७ तर औरंगाबादेत २०६४ आहे. सर्वच प्रकारच्या कॅन्सर रु ग्णांची नोंद घेतली तर नागपुरात दर लाख लोकसंख्येपैकी १०७ महिला तर ९७ पुरुषांचे प्रमाण आहे. कॅन्सरवर वेळीच उपाययोजना केली नाही तर एकट्या उपराजधानीत दर लाखात २२९ महिला तर १८२ पुरु ष कॅन्सरच्या उंबरठ्यावर पोहचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण नागपुरात ३२ टक्केदेशात १९८२-८३ मध्ये एकूणच कॅन्सरमध्ये गर्भाशय मुखाचा कॅन्सर नंबर एकवर होता. त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर स्तनाचा (ब्रेस्ट) कॅन्सर होता मात्र मागील ३० वर्षात यात बदल झाला आहे. हा कॅन्सर जगभरातल्या स्त्रियांच्या मृत्यूचे सर्वांत मोठे कारण ठरत आहे. यात दगावणाऱ्या एकूण महिलांपैकी एकट्या भारतातील २३ टक्के महिलांचा समावेश आहे. हा आकडा ७० हजारांच्या घरात जातो. नागपुरात हे प्रमाण ३२ टक्के तर पहिल्या क्रमांकावर असलेल्या अहमदाबादमध्ये हे प्रमाण ३७ टक्के आहे. -डॉ. क्रिष्णा कांबळे, प्रसिद्ध आॅन्कोलॉजी तज्ज्ञ