शहरं
Join us  
Trending Stories
1
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
2
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
3
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
4
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
5
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
6
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
7
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
8
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
9
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
10
विमानाचं उडणं, उतरणं... एका श्वासाचं अंतर!
11
५९ देश, ६१ भाषांतील ३१४ चित्रपटांची मेजवानी
12
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
13
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
14
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
15
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
16
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
17
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
18
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
19
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
20
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...

केंद्रातही जादूटोणाविरोधी कायदा लागू व्हावा! - श्याम मानव

By admin | Published: June 20, 2017 5:10 PM

काटेकोर अंमलबजावणी व व्यापक जनजागृती करण्यासोबतच जादूटोणाविरोधी कायदा आता केंद्रातही लागू व्हावा या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

अकोला : आघाडी सरकारच्या कार्यकाळात कार्यान्वित झालेली जादूटोणाविरोधी कायदा प्रचार, प्रसार, जनजागृती व अंमलबजावणी समिती भाजप सरकारच्या काळातही कार्यरत आहे. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या प्रशासन काळातील पकड युती सरकारमध्ये दिसून येत नाही. अंधश्रद्धेपोटी कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी अधिक काटेकोर अंमलबजावणी व व्यापक जनजागृती करण्यासोबतच जादूटोणाविरोधी कायदा आता केंद्रातही लागू व्हावा या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक व शासकीय समितीचे सहअध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.काँग्रेसच्या कार्यकाळात निर्माण झालेला हा कायदा सर्वसंमतीने पारीत करण्यासाठी विरोधी बाकावर असलेल्या भाजप व शिवसेनेनेही मदत केल्याचा श्याम मानव यांनी आवर्जून उल्लेख केला. महाराष्ट्राचा पाया पुरोगामी विचारांचा असल्याने येथे हा कायदा होऊ शकला. हा कायदा नागरिकांपर्यंत पोहचावा यासाठी महाराष्ट्राच्या सर्व जिल्हास्थळी जाहीर सभा झाल्या. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी दक्षता अधिकारी नियुक्त असल्याने सर्व विभागात पोलिस मुख्यालयी अधिकार्‍यांचे सखोल प्रशिक्षणही घेण्यात आले; मात्र या कार्यात सातत्य ठेवण्यासाठी व्यापक प्रचार महत्वाचा ठरतो. अ. भा. अनिंसने आजतागायत कोणताही शासकीय अथवा विदेशी निधी स्विकारला नसून, कायद्याच्या प्रचारार्थ उपलब्ध झालेला निधीही प्रशासकीय स्तरावरच खर्च केल्या गेला असल्याचे प्रा. मानव यांनी सांगितले.आज देशभरात कायदा लागू होण्याची गरज प्रकर्षाने निर्माण झाली आहे. त्या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामदास आठवले यांच्याशी प्राथमिक चर्चा झाल्याचेही मानव यांनी सांगितले. राजकीय पक्षाचा याला विरोध नसतोच. सनातन संस्था सारख्या धर्मांध संघटना अन्य कट्टरवाद्यांना हाताशी घेऊन सतत अडसर निर्माण करीत असतात; मात्र दाभोळकर आणि पाणसरे यांच्या हत्या प्रकरणात सनातनची माणसे सापडल्याने सामाजिक पाठिंबा ते गमावून बसले आहेत, असे मानव म्हणाले. अंधश्रद्धा निर्मुलनाची ही चळवळ व उपक्रम आपल्या मृत्यूनंतरही सुरु राहावी यासाठी आपली स्थावर मालमत्ता अ.भा. अनिंसच्या सुपूर्द करीत असल्याचेही श्याम मानव यांनी जाहीर केले.पत्रकार परिषदेला अ. भा. अनिंसचे राज्य प्रवक्ता पुरुषोत्तम आवारे पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख शरद वानखडे, अशोक घाटे, प्रा. स्वप्ना लांडे, महानगर संघटक चंद्रकांत झटाले, जिल्हा सचिव संतोषकुमार ताले पाटील यांची उपस्थिती होती.