शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अंतरा दास हत्याप्रकरणाची माहिती देणा-यास 25 हजारांचे बक्षीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 14:59 IST

आयटी अभियंता अंतरा देवानंद दास या तरुणीच्या हत्याप्रकरणी माहिती देणा-यास पुणे ग्रामीण पोलिसांकडून 25 हजारांचे बक्षीस जाहीर

पिंपरी, दि. 11 - आयटी अभियंता अंतरा देवानंद दास या तरुणीच्या हत्याप्रकरणाची माहिती देणा-यास पुणे ग्रामीण पोलिसांकडून 25 हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. सात महिन्यांपुर्वी तळवडे येथे अंतरा दासचा खून झाला होता.  याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. देहूरोड पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटकही केली होती. मात्र, तपासाच्या दृष्टीने पुरेशी माहिती मिळाली नाही. दरम्यान, या प्रकरणी कोणाला अधिक माहिती असल्यास माहिती देण्याचे आवाहन पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात आले आहे. योग्य माहिती देणा-यास पोलिसांकडून 25 हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. काय आहे नेमकी घटना ?कॅपजेमिनी कंपनीतील महिला अभियंता अंतरा दासची डिसेंबर 2016 मध्ये हत्या झाली होती. तळवडे एमआयडीसी परिसरात भर रस्त्यात रात्री तिची धारदार शस्त्राने भोसकडून हत्या करण्यात आली.  याप्रकरणी आरोपी संतोष कुमारला पोलिसांनी बंगळुरुतून अटक करण्यात आली होती. संतोष हा मूळचा बिहारचा असून तो बंगळुरुमधील एका आयटी कंपनीत नोकरी करत होता.अंतरा बंगळुरूमध्ये ट्रेनिंगला असताना तिची संतोषशी ओळख झाली होती. तेव्हा पासून तो  तिच्या संपर्क होता. तिच्यावर तो एकतर्फी प्रेम करत होता. तसेच त्याने अंतराला लग्नाची मागणीही घातली होती.  मात्र, अंतरा लग्न करण्यास तयार नव्हती. अंतराने वेळोवेळी संतोषचा मोबाईल क्रमांक "ब्लॉक" केला होता. तसेच अंतरा पुण्यात कुणासोबात फिरत आहे. तिच्यावर लक्ष ठेवण्याचे त्याने मित्रांना सांगितले होते.अंतरा ही तळवडे येथील कॅपजेमिनी या कंपनीत एप्रिलपासून नोकरी करत होती. नेहमी कंपनीची कॅब घेऊन जाणारी अंतरा 23 डिसेंबर रोजी रात्री तळवडे येथील केएनबी चौकातून पायी जात होती. त्यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञाताने तिच्या डोक्यावर आणि मानेवर धारदार हत्याराने वार केले आणि पसार झाला. अंतरा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्यावेळी तेथून जाणा-या सत्येंद्र सिंपी यांनी तिला त्वरित उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारापूर्वीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.