मुंबई : गोरेगावच्या बॉम्बे एग्झिबिशन सेंटरमध्ये अजून एका हिºयाची चोरी झाल्याचे उघड झाले आहे. बुधवारी या हिºयाच्या मालकाने वनराई पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. या चोरीमागे देखील याच चिनीचोरांचा हात असल्याचा संशय वनराई पोलिसांना असून, त्यांची अधिक चौकशी सुरू आहे.बुधवारी अजून एक हिरा चोरी झाल्याची तक्रार वनराई पोलिसांत दाखल झाली. या हिºयाची किंमत जवळपास २ लाख ६४ हजार रुपये असल्याचे समजते. याप्रकरणी बुधवारी संध्याकाळी माहिती पोलिसांना मिळाल्याचे पोलीस निरीक्षक आणि तपासअधिकारी महादेव निंबाळकर यांनी सांगितले. या चोरीमागे देखील चियांग चांगक्विंग (४७), आणि डेंग झियाबो (४५), या चायनीजचोरांचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. दोघांनाही सध्या ३४ लाख रुपये किमतींच्या हिरेचोरीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या दोन्ही चिनीचोरांना स्थानिक न्यायालयात हजर केले. त्यांच्याकडून चोरीला गेलेली शंभर टक्के मालमत्ता हस्तगत करण्यात आल्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, आता या हिºयाच्या चौकशीसाठी वनराई पोलीस त्यांचा पुन्हा ताबा मागणार आहेत.
आणखी एका हि-याची चोरी! ‘चायनीज’ चोरांवरच संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 07:53 IST