कोल्हापूर: जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजताच कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) मोठे बंड उफाळून आले आहे. पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विश्वासू मानल्या जाणाऱ्या शीतल फराकटे यांना उमेदवारी नाकारल्याने पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. "माईक घेऊन सभा गाजवल्या, पण हक्काची उमेदवारी मागताच डावलले," अशा शब्दांत त्यांनी आपली खदखद व्यक्त केली असून आता त्या अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
सभा गाजवणाऱ्या नेत्यावरच अन्याय?शीतल फराकटे यांची ओळख कोल्हापुरात एक आक्रमक वक्त्या म्हणून आहे. हसन मुश्रीफ यांच्या प्रत्येक सभेत आपल्या भाषणाने रान पेटवणाऱ्या फराकटे यांना जिल्हा परिषदेसाठी पक्षाकडून शब्द देण्यात आला होता. मात्र, ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने त्यांनी थेट बंडाचे निशाण फडकवले आहे.
सोशल मीडियावर 'तोफ' डागली!उमेदवारी नाकारल्यानंतर शीतल फराकटे यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, जो सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. "आधी शब्द दिला आणि ऐनवेळी पाठीत खंजीर खुपसला," असा आरोप करत त्यांनी मंत्र्यांवर तोफ डागली आहे. पक्षाने निष्ठावंतांना डावलून नव्यांना संधी दिल्याने आता त्यांनी 'एकला चलो रे'ची भूमिका घेत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
Web Summary : NCP leader Sheetal Pharakte denied Kolhapur election ticket, sparking rebellion. Alleging betrayal after promised candidacy, she'll contest independently. Her video criticizing ministers went viral.
Web Summary : कोल्हापुर में एनसीपी नेता शीतल फराकटे को टिकट से इनकार, बगावत। वादा खिलाफी का आरोप, अब स्वतंत्र रूप से चुनाव लड़ेंगी। मंत्रियों की आलोचना का वीडियो वायरल।