शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर उद्या मराठी माणसाला कोण वाचवणार?; RSS, बजरंग दलमध्ये ९० टक्के उत्तर भारतीय"
2
सिंगापूरमध्ये शाळेला आग, पवन कल्याण यांचा मुलगा जखमी; लवकरच रवाना होणार आंध्रचे उपमुख्यमंत्री
3
मंगेशकरांना जमीन दान करुन पश्चात्ताप होतोय..! दीनानाथ रुग्णालयासाठी जमीन देणाऱ्यांची खंत
4
"तू एक काम कर..."; मरणाच्या दारातून परतलेल्या रिषभ पंतला आशिष नेहराने दिलेला मोलाचा सल्ला
5
Hanuman Jayanti 2025: हनुमान जयंतीनिमित्त महाराष्ट्राच्या 'या' मंदिरांमध्ये घ्या मिशीवाल्या मारुतीचे दर्शन!
6
जगाला मंदीच्या गर्तेत अडकवणार ट्रम्प यांचा हट्ट? काय आहे ९५ वर्षे जुनी स्मूट-हॉले टॅरिफची भयाण कहाणी
7
धक्कादायक! आणखी १५ वर्षं खेळायचं होतं पण..., क्रिकेटपटूने २७ व्या वर्षीच स्वीकारली निवृत्ती
8
...अन् सगळं उलटंच घडलं! टॅरिफच्या मुद्द्यावर धावत अमेरिकेत पोहोचलेल्या नेतन्याहू यांना ट्रम्प यांचे दोन झटके
9
Nashik: नाशिकमध्ये पतीने स्वत:ला पेटवून घेत पत्नी-सासूला मारली मिठी; मध्यरात्री घडला थरार
10
व्वा रे पठ्ठ्या! कमी गुणांमुळे शाळेने काढलं पण 'तो' खचला नाही; कष्टाने बदललं नशीब, झाला IPS
11
पीपीएफ योजनेचा कालावधी वाढवण्यासाठी अर्ज कधी करावा? 'ही' तारखी चुकली तर सर्व मेहनत पाण्यात
12
"सहा वर्षांपासून मला एकही ऑफर मिळाली नाही कारण.."; प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितलं इंडस्ट्रीतील वास्तव
13
राष्ट्रवादीचे नेते अन् माजी महापौरांनी उचललं टोकाचं पाऊल; आयुष्य संपवण्याचा प्रयत्न
14
शेअर बाजारावर आहे मोदी सरकारची बारीक नजर, घेऊ शकतात मोठा निर्णय
15
काळाचा घाला! साता जन्माचं नातं एका क्षणात तुटलं; रात्री सप्तपदी अन् सकाळी नववधूचा मृत्यू
16
"मला जे करायचं होतं ते करता येत नव्हतं...", 'चला हवा येऊ द्या'बद्दल नेमकं काय म्हणाली श्रेया बुगडे?
17
"बळजबरीनं सेक्स, ओपन मॅरेजसाठी दबाव टाकायचा..."; पत्नीचे प्रसन्ना शंकर यांच्यावर आरोप
18
टॅरिफ वॉर आणखी भडकणार...! अंड्यांपासून, सोयाबीनपर्यंत 'या' वस्तू महागणार; ट्रम्प यांच्या विरोधात 27 देशांची 'वज्रमूठ'
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे इलॉन मस्क गोत्यात? या कारणावरुन पहिल्यांदाच आमने-सामने
20
विशाल ददलानीचा 'इंडियन आयडॉल'ला निरोप, गेल्या ६ सीझनपासून होता परीक्षक; भावुक पोस्ट

शेगावच्या ‘आनंद सागर’ला आणखी ३0 वर्षांचा भाडेपट्टा!

By admin | Updated: July 21, 2016 01:03 IST

श्री संत गजानन महाराज संस्थानच्या ‘आनंद सागर’ प्रकल्पाचा भाडेपट्टा पुढील ३0 वर्षांसाठी वाढवून देण्याचा शासनाचा निर्णय.

शेगाव (जि. बुलडाणा) : शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानच्या ह्यआनंद सागरह्ण या मनोहारी प्रकल्पाचा भाडेपट्टा पुढील ३0 वर्षांसाठी वाढवून देण्याचा निर्णय शासनाने १९ जुलै रोजी घेतला आहे. संतनगरी शेगावात श्री गजानन महाराज संस्थानने बाळापूर मार्गावरील शासनाच्या २५३ एकराच्या जागेत विज्ञान आणि अध्यात्माच्या पायावर एक मनोहारी उद्यान ह्यआनंद सागरह्ण या नावाने तयार केले आहे. या प्रकल्पाला १७ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असून, आतापयर्ंत ४0 लाखांच्या जवळपास भाविक व पर्यटकांनी या प्रकल्पाला भेट दिली आहे. सुरुवातीला शासनाने ही जमीन १५ वर्षांकरिता संस्थानला भाडेपट्टय़ावर हस्तांतरित केली होती. त्यानुसार २६ डिसेंबर २0१४ रोजी या जागेची लीज संपली. त्यानंतर श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगाव नगर परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा याशिवाय विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून सदर जागेची लीज वाढून देण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार केले. ह्यआनंद सागरह्णला देण्यात आलेल्या जमिनीसाठी नाममात्र एक रुपया भाडे आकारण्यात आले आहे. तसेच १0१.३२ हेक्टर आर जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ४0 व महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९७१ च्या नियम ५, ६ व ७ मधील तरतुदी अन्वये श्री गजानन महाराज संस्थान यांना प्रदान करण्याचा निर्णय शासनाने १९ जुलै २0१६ रोजी घेतला आहे. यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.आणखी वाढू शकतो भाडेपट्टा!आनंद सागर या प्रकल्पाची लीज २0१४ साली संपल्यानंतर लीज वाढविण्याची मागणी संस्थानमार्फत तसेच लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली. त्यामुळे शासनाने आता पुढील ३0 वर्षांकरिता एक रुपया वार्षिक भाडे तत्त्वावर लीज वाढवून दिली आहे. त्याचप्रमाणे ही लीज संपल्यानंतर जर संस्थान आणखी पुढच्या ३0 वर्षांकरिता लीज वाढवून घेण्यास इच्छुक असेल तर तसे नूतनीकरण अनुट्ठोय राहील, असे शासनाने १९ जुलै रोजी काढलेल्या अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता आनंद सागरची लीज एकूण ६0 वर्षांची असल्याचे मानले जात आहे. संस्थानला पाळाव्या लागतील अटीसंस्थानने तलावाचा वापर सौंदर्यीकरणाच्या प्रयोजनासाठी करावा. तसेच तलावात चालविणार्‍या बोटी नाममात्र शुल्क आकारून चालविणे अनिवार्य राहील, अशी अट शासनाने घातली आहे. सदर जागेवर तलावाचे सौंदर्यीकरण या प्रयोजनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रयोजनासाठी पक्के बांधकाम करू नये, बांधकामाची परवानगी नगरपलिकेकडून घेण्यात आली नसून, ती तत्काळ घेणे बंधनकारक राहील, असेही शासनाने काढलेल्या अध्यादेशात म्हटले आहे.