शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा हजारे यांना यंदाचा ‘शाहू पुरस्कार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 17:37 IST

कोल्हापूर येथील राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा आणि महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात वेगळी उंची लाभलेला मानाचा शाहू पुरस्कार यंदा माहिती अधिकार कायद्याचे प्रणेते व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना बुधवारी येथे जाहीर झाला.

ठळक मुद्देअण्णा हजारे यांना यंदाचा ‘शाहू पुरस्कार’जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा : कोल्हापुरात २६ जूनला वितरण

कोल्हापूर : येथील राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा आणि महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात वेगळी उंची लाभलेला मानाचा शाहू पुरस्कार यंदा माहिती अधिकार कायद्याचे प्रणेते व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना बुधवारी येथे जाहीर झाला.

ट्रस्टचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि विश्वस्त व ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी या पुरस्काराची घोषणा केली. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या २६ जूनला शाहू जयंतीदिनी सायंकाळी पाच वाजता शाहू स्मारकमध्ये होणाºया शानदार समारंभात या पुरस्काराचे वितरण होईल.किसन बाबूराव हजारे (जन्म १५ जून १९३७ मूळ गाव- भिंगार, जि. अहमदनगर) असे नाव असले तरी ते देशाला अण्णा हजारे या नावानेच परिचित आहेत. मूळचे सैन्यात वाहनचालक असणारे अण्णा हजारे हे भारतातील ज्येष्ठ समाजसेवक आहेत. त्यांना समाज सेवेच्या कार्याबद्दल भारत सरकारने १९९० साली ‘पद्मश्री’ आणि १९९२ साली ‘पद्मभूषण’ पुरस्कारांनी सन्मानित केले. त्यांनी लोकसहभागातून राळेगणसिद्धी या गावाचा कायापालट घडवून आणला.

स्वच्छता, पाणी व्यवस्थापन व सामाजिक सलोखा यावर त्यांनी भर दिला. या कामाबद्दल गावाला अनेक पारितोषिके मिळाली. अण्णांनी पाठपुरावा केला म्हणूनच माहिती अधिकार कायदा लागू झाला. त्याशिवायही त्यांच्या आंदोलनामुळे एकूण सहा कायदे झाले आहेत. माहितीच्या अधिकारावर त्यांनी पुस्तकाचे लेखनही केले आहे.

अण्णा हजारे यांनी वेळोवेळी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलने केली. त्यांच्या आंदोलनांमुळे महाराष्ट्राच्या अनेक मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. लष्करातील निवृत्त जवान ते लोकपालाच्या कायद्यासाठी देशातील राजकीय व्यवस्थेला हादरे देणारा लढवय्या अशीच अण्णा हजारे यांची जगभरातील ओळख आहे. त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी या गावाला विकासाचे मॉडेल बनविले व त्यातूनच ते महाराष्ट्राला परिचित झाले.आतापर्यंतचे पुरस्कार विजेते...समाजाला प्रगतीच्या दिशेने दोन पावले पुढे घेऊन जाणाऱ्या ध्येयवादी नेतृत्वास प्रतिवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा पुरस्कारचे चौतिसावे वर्ष आहे. ट्रस्टतर्फे १९८४ ला पहिला पुरस्कार पुरोगामी कृतिशील विचारवंत भाई माधवराव बागल यांना देण्यात आला होता.त्यानंतर मेहरुनिसा दलवाई, मेघनाथ नागेशकर, कवी कुसुमाग्रज, गायिका आशा भोसले, जलतज्ञ राजेंद्र सिंह, ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील, रयत शिक्षण संस्था, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, माजी सरन्यायाधीश पी. बी. सावंत, ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे, शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ नेते शरद पवार, आदी मान्यवरांचा या पुरस्काराने आतापर्यंत सन्मान केला आहे.

राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाने जाहीर झालेला पुरस्कार हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च सन्मान आहे. शाहूंनी आपले सारे आयुष्य गोरगरीब पददलित जनतेच्या भल्यासाठी खर्ची घातले अशा थोर राजाच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार या घटकांसाठी काम करण्यासाठी नवी उमेद देणारा आहे.अण्णा हजारेज्येष्ठ समाजसेवक 

 

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेkolhapurकोल्हापूर