शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ पक्षातील महत्त्वपूर्ण नियुक्त्यांची घोषणा, सुप्रिया सुळेंकडे सोपवली मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 16:43 IST

Nationalist Congress Party-Sharadchandra Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या राष्ट्रीय पक्षसंघटनेमध्ये काही नव्या नियुक्त्या करून सुप्रिया सुळेंसह इतर नेत्यांकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान आता काही वेळातच आटोपणार आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या बंडामुळे पक्षात पडलेली उभी फूट आणि यावेळी शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबातील दोन सदस्यांमध्ये लढत झाल्याने आता या निवडणुकीचा काय निकाल लागतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या राष्ट्रीय पक्षसंघटनेमध्ये काही नव्या नियुक्त्या करून सुप्रिया सुळेंसह इतर नेत्यांकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. 

या नियुक्त्यांबाबत शरद पवार गटाने एक पत्रक प्रसिद्ध करून माहिती दिली आहे. त्यानुसार ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  शरद पवार यांच्या मान्यतेने सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी माजी खासदार पी.सी.चाको यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटना आणि पक्षाची ध्येय-धोरणे अधिक बळकट करण्यासाठी दोन्ही नेतृत्वांचे सहकार्य निश्चित मिळेल, असा विश्वास  शरद पवार साहेबांनी व्यक्त केला. तसेच सुप्रिया सुळे आणि पी.सी. चाको यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, अशी माहिती या पत्रकामधून देण्यात आली आहे. दरम्यान, गतवर्षी शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षााच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली होती. मात्र त्यानंतर काही दिवसांतच प्रफुल्ल पटेल हे अजित पवार यांच्या गटात गेले होते.

त्याबरोबरच राजीव झा यांची 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार' पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहितीही या पत्रकामधून देण्यात आली आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेस