शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा हजारेंचा मोदींना शेवटचा इशारा; उत्तर द्या, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 09:40 IST

आंदोलनाच्या जागेसाठी ७ नोव्हेंबर २०१७ पासून हजारे यांनी आतापर्यंत बारा वेळा पत्रे मोदींना पाठवली आहेत.

नगर: लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर करण्यात येणाऱ्या आंदोलनासाठी वारंवार विनंती करूनही जागा उपलब्ध न करून दिल्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मोदींना शेवटचा इशारा दिला आहे. मला आंदोलनासाठी दिल्लीत जागा न उपलब्ध करून दिल्यास नाईलाजाने तुरुंगात आंदोलन करावे लागेल, असे अण्णांनी म्हटले आहे. अण्णा हजारे येत्या 23 मार्चपासून आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. आंदोलनाच्या जागेसाठी ७ नोव्हेंबर २०१७ पासून हजारे यांनी आतापर्यंत बारा वेळा पत्रे मोदींना पाठवली आहेत. मात्र, यापैकी एकाही पत्राला उत्तर देण्याचे सौजन्य पंतप्रधान मोदींनी दाखविलेले नाही. त्यामुळे अण्णांनी पंतप्रधान मोदींना अखेरचे पत्र पाठवून अंतिम इशारा दिला आहे. तत्पूर्वी राळेगणसिद्धी येथील ग्रामस्थांनी उपोषण न करण्यासाठी अण्णांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी परिवारासह देशाला गरज आहे. त्यामुळे, अण्णांनी वाढते वय व विविध व्याधींचा विचार करता नवी दिल्ली येथे उपोषण न करता काही तरी वेगळ्या स्वरूपाचे आंदोलन करावे, असे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र, उपोषणाने मी मरणार नाही अन् सरकारमध्ये मला मरू देण्याची हिंमत नाही, असे सांगत अण्णा हजारे यांनी नवी दिल्ली येथे २३ मार्चपासून उपोषण आंदोलन करण्याचा निर्धार कायम ठेवला होता. अण्णा हजारे यांनी आतापर्यंत लोकपाल तसेच जनतेच्या हिताच्या विविध मुद्यांवर ४३ पत्रे पंतप्रधानांना पाठवली आहेत.  मात्र, यापैकी एकाही पत्राला नरेंद्र मोदी यांच्याकडून उत्तर देण्यात आलेले नाही.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेNarendra Modiनरेंद्र मोदी