शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गाजावाजा न करता उभारतेय लाखभर वस्तिमित्रांचे ‘अनुलोम’

By यदू जोशी | Updated: January 4, 2018 05:52 IST

कुठेही गाजावाजा, प्रसिद्धी नाही अन् श्रेयवादाची लढाई नाही, हे तत्त्व अंगीकारत, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचावा, यासाठी अविरत प्रयत्न करणारे तब्बल ७५ हजार वस्तिमित्रांचे एक जाळे ‘अनुलोम’ या नावाने महाराष्ट्रात उभारण्यात आले असून

मुंबई - कुठेही गाजावाजा, प्रसिद्धी नाही अन् श्रेयवादाची लढाई नाही, हे तत्त्व अंगीकारत, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचावा, यासाठी अविरत प्रयत्न करणारे तब्बल ७५ हजार वस्तिमित्रांचे एक जाळे ‘अनुलोम’ या नावाने महाराष्ट्रात उभारण्यात आले असून, लवकरच ते लाखाचा टप्पा गाठणार आहे.‘अनुलोम’ म्हणजे अनुगामी लोकराज्य महाअभियान. रयतेच्या राज्याची संकल्पना खºया अर्थाने सिद्ध व्हावी, यासाठी सरकारच्या प्रयत्नांना समर्थ साथ देण्याच्या उद्देशाने ‘अनुलोम’ची संकल्पना साकार झाली आहे. हे सरकार आपले आहे, अशी भावना सामान्यांच्या मनात निर्माण करण्याचा उद्देशही आहेच.बड्या कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे पॅकेज हाती असताना ते क्षणात बाजूला सारून, ‘अनुलोम’ची उभारणी केली, ती उच्चशिक्षित असलेले अतुल वझे यांनी. ते ‘अनुलोम’चे सीईओ आहेत. ते, पंकज पाठक, स्वानंद ओक अशांनी एकत्रित येऊन गेल्या दोन वर्षांत हे जाळे विणले. प्रत्येक विधानसभा मतदार संघात एक, प्रत्येक लोकसभा मतदार संघात एक आणि सहा लोकसभा मतदार संघ मिळून एक अशा ३५४ जनसेवकांची भक्कम फळी तयार करण्यात आली. प्रत्येक जनसेवकाने दररोज किमान १० जणांना अभियानात जोडले. त्यातून हजारो कार्यकर्ते निरपेक्ष भावनेने सोबत आले. अनुलोममधील वस्तिमित्र कुठल्याही मानधनाशिवाय कामे करतात. जे प्रमुख लोक आहेत, त्यांच्या उदरनिर्वाहाची तजवीज सीएसआर फंडातून केली जाते. शासकीय योजनांबाबत जनसेवक आणि वस्तिमित्रांना अद्ययावत माहिती असावी, म्हणून त्यांना दर ३ महिन्यांनी प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी विविध विभागांच्या शासकीय अधिकाºयांची मदत घेतली जाते.अतुल वझे आणि त्यांच्या सहकाºयांनी मुख्यमंत्री कार्यालयातील ओएसडी श्रीकांत भारतीय यांच्या माध्यमातून, काही महिन्यांपूर्वी ‘अनुलोम’च्या संकल्पनेचे सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर केले. मुख्यमंत्र्यांच्या सदिच्छांचे भक्कम पाठबळ आज ‘अनुलोम’च्या मागे आहे.५ हजार तलावांतील गाळ नेणार शेतांमध्येतलावांची साठवण क्षमता वाढेल आणि शेतीही सुपीक होईल, या उद्देशाने राज्यातील हजारो पाझर तलावांमधील गाळ काढून, तो शेतामध्ये नेण्याची योजना राज्य शासनाने आखली आहे. ‘अनुलोम’मधील वस्तिमित्र आता येत्या फेब्रुवारी ते मे-जूनपर्यंत तब्बल ५ हजार तलावांमधील गाळ काढून शेतीवर नेण्यासाठी खपणार आहेत. त्यासाठी लोकसहभाग घेतला जाईल.काटेकोर आचारसंहितासमाजातील शेवटच्या माणसाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी धडपड करणाºया वस्तिमित्रांसाठी एक आचारसंहिता घालून देण्यात आली आहे. ती म्हणजे, कुठेही शासकीय यंत्रणेवर दादागिरी करायची नाही. ‘माहिती नाही का, मी वस्तिमित्र आहे म्हणून!’असा अहम् भाव येऊ द्यायचा नाही. यंत्रणेशी सहकार्य करून साध्य गाठायचे. आचारसंहितेचे काटेकोर पालन केले जाते.

टॅग्स :GovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्र