शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पशुधनावर विघ्न! राज्यभरात लम्पीचे ३० बळी; २१५६ जनावरे बाधित, लक्षणे तपासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 10:54 IST

जनावरांचे सर्व बाजार, पशू प्रदर्शने, आंतरराज्य व राज्यांतर्गत गोवंशीय व महिषवर्गीय पशुवाहतूक, बैलगाडा शर्यती यावर बंदी. 

मुंबई : राजस्थान, पंजाब व गुजरात राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रात दाखल झालेल्या जनावरांमधील लम्पी त्वचारोगाने पशुधनावर मोठे विघ्न आले आहे. राज्यात ३१ जनावरांचा बळी घेतला असून २,१५६ जनावरे बाधित झालेली आहेत. अन्य जिल्ह्यांमध्ये याचा प्रसार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून पशुसंवर्धन विभागाला देण्यात आल्या आहेत.

काय केल्या उपाययोजना?राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित. जनावरांचे सर्व बाजार, पशू प्रदर्शने, आंतरराज्य व राज्यांतर्गत गोवंशीय व महिषवर्गीय पशुवाहतूक, बैलगाडा शर्यती यावर बंदी. पशुसंवर्धन विभागामार्फत लम्पी प्रादुर्भाव झालेल्या गावापासून ५ किमी परिघातील क्षेत्रामध्ये लसीकरण.बाहेरून जनावरे खरेदी करून आणण्यास बंदी.

प्राण्यांपासून संक्रमित होत नाहीहा संसर्गजन्य रोग असल्याने उपचारापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावी ठरते.लम्पीचे शेळ्या-मेंढ्यांमधील देवीच्या विषाणूशी साधर्म्य आढळून येत असले तरी हा आजार शेळ्या-मेढ्यांना होत नाही. हा आजार जनावरांपासून मानवात संक्रमित होत नाही. देशीपेक्षा संकरित जनावरांना लागण होण्याची शक्यता अधिक.

कुठून कुठे पसरला?राज्यात सर्वप्रथम ४ ऑगस्ट २०२२ रोजी जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील चिनावल या गावामध्ये लम्पीची लागण झाली. त्यानंतर हा राेग झपाट्याने अहमदनगर, धुळे, अकोलासह पुणे, काेल्हापूर, सातारा, सांगली व साेलापूर या जिल्ह्यांमध्येही झपाट्याने पसरला.

अशी घ्या खबरदारी

बाह्य कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्याची व्यवस्थित स्वच्छता ठेवावी. आजारसदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा.जनावरांना लक्षणे आढळल्यास तत्काळ पशुवैद्यकांना दाखवावे. 

या २० जिल्ह्यांत पसरला प्रादुर्भाव, लक्षणे तपासा

जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास आदी ठिकाणी गाठी

तोंडात, घशात व श्वसननलिका, फुप्फुसांत पुरळ व फोड

जनावरांच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ गळती

जनावरांना अशक्तपणा येतो व भूक मंदावते, डोळ्यांमध्ये जखमा तयार होतात

टॅग्स :Lumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोग