शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Rajya Sabha Election : अनिल देशमुखांची मतदानासाठी खटपट, मुंबई उच्च न्यायालयात घेतली धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 18:10 IST

Anil Deshmukh has moved Bombay High Court : उद्याच्या मतदानात अनिल देशमुख यांना सहभाग घेता येणार की नाही यावर तूर्तास प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुंबई : विशेष पीएमएलए न्यायालयाने महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मोठा दणका दिला आहे. उद्या होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya sabha Election) मतदान करण्याची परवानगी द्यावी असा अर्ज मलिक आणि देशमुख यांच्यावतीने करण्यात आला. परंतु कोर्टाने हा अर्ज फेटाळला आहे. या विशेष पीएमएलए न्यायालयाच्या निकालाविरोधात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे उद्याच्या मतदानात अनिल देशमुख यांना सहभाग घेता येणार की नाही यावर तूर्तास प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजपाने ३, शिवसेनेने २, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी एक-  उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. या निवडणुकीत सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना-भाजपा यांच्यात थेट लढत आहे.

मतदानाला मुकावे लागणार, नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना कोर्टाने दिला दणका

येत्या १० जूनला मतदान होणार असून तत्पूर्वी कुठलाही घोडेबाजार होऊ नये यासाठी सत्ताधारी पक्ष विशेष खबरदारी घेत आहे. या निवडणुकीसाठी १ मतही महत्त्वाचे असल्याने महाविकास आघाडीची २ मते बाद झाल्याने मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी मविआ नेत्यांना आणखी कसरत करावी लागणार आहे. परंतु न्यायालयानं हा अर्ज नाकारल्यानं  मतदानात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना सहभाग घेता येणार नाही. दरम्यान, यावर जलसंपदा मंत्री जयंत राटील यांनी न्यायालयाच्या या निर्णयामुळे निराशा झाल्याचं म्हटलं.

 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखHigh Courtउच्च न्यायालयVotingमतदानRajya Sabhaराज्यसभा