शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

अनिल अंबानी उद्योग समूहाचे मुख्यालय येस बँकेच्या ताब्यात; दोन महिन्यांची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 06:38 IST

अनिल धिरूभाई अंबानी ग्रुपचे (एडीएजी रिलायन्स सेंटर) हे मुख्यालय सांताक्रूझ पूर्व येथे असून, त्याचे क्षेत्रफळ २१,४३२ चौ. फूट इतके आहे.

मुंबई : आर्थिक संकटात सापडलेले उद्योगपती अनिल अंबानी यांनी २,८९२ कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे येस बँकेने त्यांच्या उद्योगसमूहाचे मुंबईतील मुख्यालय ताब्यात घेतले आहे, तसेच दक्षिण मुंबईतील नगिना महाल या इमारतीत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या मालकीच्या दोन सदनिकाही बँकेने ताब्यात घेतल्या आहेत.

अनिल धिरूभाई अंबानी ग्रुपचे (एडीएजी रिलायन्स सेंटर) हे मुख्यालय सांताक्रूझ पूर्व येथे असून, त्याचे क्षेत्रफळ २१,४३२ चौ. फूट इतके आहे. कर्जाची परतफेड साठ दिवसांच्या आत करा, अशी नोटीस येस बँकेने रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला ५ मे रोजी बजावली होती; पण कंपनीचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी कर्जफेड न केल्याने येस बँकेने ही कारवाई केली.

येस बँकेकडून अनिल अंबानी यांच्या समूहाने एकूण १२ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्यामुळे कर्जवसुलीसाठी येस बँकेने २२ जुलैला अनिल अंबानी समूहाचे रिलायन्स सेंटर हे मुख्यालय व अन्य मालमत्ता ताब्यात घेण्यास सुरुवात केली.येस बँकेकडून घेतलेल्या कजार्बाबत अनिल अंबानी यांची अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी १९ मार्च रोजी चौकशी केली होती. त्यावेळी येस बँकेकडून कायद्याचे पालन करूनच कर्ज घेण्यात आल्याचे अनिल अंबानी म्हणाले होते. कर्ज फेडण्यासाठी आम्ही पावलेही उचलली होती, असेही त्यांनी चौकशीत सांगितले होते.सर्व हक्क बँकेकडेअनिल अंबानी यांच्या उद्योगसमूहाच्या सर्व कंपन्यांचा कारभार सांताक्रूझ पूर्व येथील रिलायन्स सेंटर या मुख्यालयातूनच चालत होता. त्यामुळे ही वास्तू त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. या मालमत्तेच्या विक्री किंवा अन्य व्यवहारांसंदर्भातील सर्व हक्क यापुढील काळात येस बँकेकडे असतील. दक्षिण मुंबईतील नगिना महाल येथील दोन सदनिकांचे क्षेत्रफळ अनुक्रमे १,७१७ चौ. फूट व ४९३६ चौ. फूट आहे. बुडीत कर्जांच्या समस्येमुळे येस बँकही डबघाईला आली होती.

टॅग्स :Anil Ambaniअनिल अंबानीYes Bankयेस बँक