शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

नाराज एकनाथ खडसेंचा भाजपाला अल्टीमेटम; 'त्या' नेत्यांवर कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 05:39 IST

खडसे यांनी गुरुवारी नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते शुक्रवारी जळगावात परतले.

जळगाव : गेल्या चार वर्षांत विरोधात षडयंत्र रचून मला छळण्यात आले. माझा पक्षावर रोष नाही, मात्र माझ्याविरुद्ध कट रचणाऱ्या पक्षातीलच नेत्यांवर कारवाई करण्याची आपली मागणी असून ती चार ते पाच नावे आपण नेतृत्वाकडे दिली आहे. त्यांच्यावर कारवाई झाली तर आपले काही म्हणणे नाही, अन्यथा पक्षांतर करण्याचा इशारा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिला.

खडसे यांनी गुरुवारी नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते शुक्रवारी जळगावात परतले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, पक्षावर माझी नाराजी नाही, मात्र कट रचणाऱ्यांवर कारवाईची मागणी कायम आहे. माझ्यावर आरोप करणे, चौकशा लावणे, असे प्रकार त्यांनी केले आहेत. या लोकांविरुद्ध मी तक्रार केली आहे. त्यांची नावेही तक्रारीत दिली असून त्यासंबंधी सर्व पुरावेही दिले आहेत. त्यामुळे पक्षाने आता त्यांच्यावर कारवाई करावी, हीच अपेक्षा आहे. ज्यांच्यावर माझा रोष आहे, त्यांच्यासोबत मी काम कसे करणार? पक्षाने संबंधित लोकांवर कारवाई केली नाही तर पक्षांतर करेल. माझ्या समर्थकांसह राज्यभरातील कार्यकर्त्यांचा माझ्यावर पक्षांतराचा मोठा दबाव आहे, असेही खडसे यावेळी म्हणाले.

ज्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत, अशा अन्य नेत्यांना पक्षात प्रवेश मिळतो. त्यांना पक्षात महत्त्वाचे स्थान दिले जाते. इतर पक्षातील नेत्यांना पायघड्या टाकल्या जात असताना मला डावलण्याचे कारण काय? असा प्रश्नही खडसे यांनी उपस्थित केला. दरम्यान, आपण कोणत्या पक्षात जाणार हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे खडसे यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मंत्रीपदाचा राजीनामा देण्यापासून ते विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने व त्यानंतरही मुलगी अ‍ॅड. रोहिणी खडसे यांचा पक्षातीलच हितशत्रूंमुळे पराभव, पक्षांच्या कार्यक्रमात डावलणे अशा विविध कारणामुळे भाजपकडून सतत अन्याय व अपमानाची वागणूक मिळत असल्याचे सांगत खडसे यांनी या पूर्वी अनेक वेळा जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर गोपीनाथ गडावर पक्षांतराबाबत ‘माझा काही भरोसा नाही’, असे म्हणणारे एकनाथराव खडसे हे शिवसेनेत जाणार तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असे वृत्त सध्या येत आहे.

उत्तर महाराष्ट्रात भाजप वाढीमध्ये सिंहाचा वाटा असणाºया खडसे यांच्यावर पक्षाकडून खरोखरच अन्याय होत असल्याचे आता त्यांचे समर्थक, कार्यकर्ते म्हणू लागले आहेत. मात्र खडसे जो काही निर्णय घेतील, तो विचारपूर्वकच घेतील, असेही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यात नागपुरात अधिवेशन काळातच खडसे तेथे असल्याने ते काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा