शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेज; अँजिओप्लास्टी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 21:16 IST

लीलावती रुग्णालयात संजय राऊत यांच्यावर उपचार सुरू

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेज आढळून आले आहेत. त्यांच्यावर सध्या लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी सुरू आहे. अँजिओप्लास्टी झाल्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये हलवलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस संजय राऊत राजकारणात सक्रीय होण्याची शक्यता अतिशय कमी आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून भाजपावर सतत टीकेचे बाण मारणाऱ्या संजय राऊत यांना आज दुपारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. छातीत दुखू लागल्यानं राऊत उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाले. पुढील दोन दिवस ते रुग्णालयात असतील.गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत शिवसेनेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळत होते. कामाचा व्याप वाढल्यानं गेल्या काही दिवसांपासून त्यांना त्रास होत होता. मात्र त्याकडे त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केलं. अखेर आज दुपारी कुटुंबीयांच्या आग्रहाखातर ते उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावर डॉ. जलील पारकर यांची टीम उपचार करत आहेत. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर संजय राऊत यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. त्यातून त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेज असल्याचं आढळून आलं. त्यानंतर आता त्यांच्यावर अँजिओप्लास्टी सुरू आहे. त्यामुळे पुढील काही दिवस त्यांना विश्रांती घ्यावी लागेल. राऊत यांच्या वेळापत्रकात गेल्या काही दिवसांपासून बदल झाला होता. याशिवाय त्यांच्यावरील कामाचा ताण वाढला होता. त्यांच्यावर पक्षाकडून विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. या जबाबदाऱ्या आता खासदार अनिल देसाई, अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना