शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

न झालेल्या लग्नाच्या अफवेचा मनस्ताप, सर्वात कमी उंची ज्योतीच्या आमगेचे कुटुंबीय हैराण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 22:17 IST

जगातील सर्वात कमी उंचीची व्यक्ती म्हणून  गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली ज्योती आमगे हिला जगभरात ओळखले जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ज्योतीचे हास्य हरविले आहे, उत्साह मावळला आहे अन् इतरांना प्रेरणा देणारी ज्योती चक्क  डिप्रेस  झाल्याचे सांगते आहे.

नागपूर, दि. 4 -  जगातील सर्वात कमी उंचीची व्यक्ती म्हणून  गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली ज्योती आमगे हिला जगभरात ओळखले जाते. सदा हसतमुख आणि चैतन्याने खळखणारे असे तिचे व्यक्तिमत्त्व आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ज्योतीचे हास्य हरविले आहे, उत्साह मावळला आहे अन् इतरांना प्रेरणा देणारी ज्योती चक्क  डिप्रेस  झाल्याचे सांगते आहे. हे सगळे घडले आहे, ते तिच्या न झालेल्या लग्नाबाबत ह्यसोशल मीडिया वर उठलेल्या अफवांमुळे.ज्योतीचे अमेरिकेतील एका  एनआरआय  तरुणासोबत लग्न झाल्याची  पोस्ट गेल्या काही दिवसांपासून ह्यसोशल मीडियाह्णवर फिरत आहे. या  पोस्ट मुळे ज्योती आणि तिच्या कुटुंबीयांना जगभरातून इंटरनेट, मोबाईलच्या माध्यमातून विचारणा होत आहे. लोकांचे फोन उचलता उचलता त्यांच्या नाकीनऊ झाले आहे. जे लग्न झालेच नाही, त्याची अफवा वेगाने पसरली आहे. याचा त्रास ज्योतीला होत आहे. आपण ह्यडिप्रेसह्ण झालो असल्याची भावना तिने  फेसबुकवर व्यक्त केली आहे. मात्र तिला सर्वांकडून हिंमतीने उभे राहण्याचे पाठबळ मिळत आहे. सायबर सेल कडे तक्रारयासंदर्भात  लोकमतने ज्योती आमगे हिच्याशी संपर्क साधला असता तिने या अफवांमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे सांगितले. जगभरात फिरत असताना अनेक जण छायाचित्रे काढतात. यातीलच एका छायाचित्राचा गैरवापर करण्यात येत आहे. यासंदर्भात मी ह्यसायबर सेलह्णकडे तक्रार केली आहे, असे तिने सांगितले.

टॅग्स :Indiaभारत