शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

Andheri East By Election Result Update: अंधेरीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल पेटणार? थोड्याच वेळात मतमोजणी; कोण जिंकणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 07:59 IST

Andheri East By Election Result Live: अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांनी निवडणूक लढविली आहे.

देशभरातील सहा राज्यांतील सात विधानसभा सीटवर पोटनिवडणूक झाली आहे. आज यावर मतमोजणी असणार असून तीन भगवा दल, दोन काँग्रेस आणि एक शिवसेना आणि राजद अशा पक्षांकडे असलेले मतदारसंघ आहेत. महाराष्ट्रात अंधेरी पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूकीचे मतदान झाले असून थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतदान कमी प्रमाणात झाल्याने ठाकरे गटाची धाकधुक वाढली आहे. 

बिहारमध्ये भाजपा वि. राजद, हरियाणामध्ये भगवा दल वि. काँग्रेस, तेलंगानामध्ये भाजपा वि. टीआरएस, उत्तर प्रदेशमध्ये सपा वि. भाजपा, ओडिशामध्ये बिजद वि. भाजपा असा मुकाबला आहे. बिहार विधानसभेच्या मोकामा आणि गोपालगंज मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी होणार आहे. या दोन जागांसाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते, त्यात ५२.३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. माजी मुख्यमंत्री भजनलाल यांच्या कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या हरियाणाच्या आदमपूर मतदारसंघाचाही समावेश आहे. 

अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी ३१.७४ टक्के मतदान झाले आहे. अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांनी तर अपक्ष म्हणून मिलिंद कांबळे, नीना खेडेकर, फरहाना सय्यद, राजेश त्रिपाठी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय बाला नाडर यांनी आपकी अपनी पार्टी पीपल्स या पक्षाकडून अर्ज भरला आहे. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घसरल्याने तसेच भाजपा-शिंदे गटाने नोटाचा कथित प्रचार केल्याने ठाकरे गटाच्या गोटात अस्वस्थता आहे. 

टॅग्स :Andheriअंधेरीandheri-east-acअंधेरी पूर्वUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना