शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Andheri East By Election Update: मोठी अपडेट! अंधेरी पूर्व  मतदारसंघात ३ वाजेपर्यंत २२.८५ टक्के मतदान; मतदारांत निरुत्साह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 15:34 IST

अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक होत आहे.

अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर आज पोटनिवडणूक आहे. याचे मतदान सकाळी ७ वाजल्यापासून सुरु झाले आहे. ही निवडणूक जरी चुरशीची नसली तरी बिनविरोध झालेली नाही. ठाकरे गटाच्या उमेदवारासमोर दुसरा तुल्यबळ उमेदवार नसल्याने मतदारांमध्येही फारसा उत्साह नसल्याचे चित्र आहे. 

अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांनी तर अपक्ष म्हणून मिलिंद कांबळे, नीना खेडेकर, फरहाना सय्यद, राजेश त्रिपाठी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय बाला नाडर यांनी आपकी अपनी पार्टी पीपल्स या पक्षाकडून अर्ज भरला आहे. गुरुवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे. मतदान करता यावे यासाठी सार्वजनिक सुट्टी लागू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या '१६६ - अंधेरी पूर्व' या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघातील सर्व २५६ मतदान केंद्रांवर मतदानाला सकाळी ७ वाजतापासून प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली आहे. यात दुपारी ३ वाजेपर्यंत २२.८५ टक्के मतदान झाले  असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली आहे. अंधेरी पूर्व मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत १६.८९ टक्के मतदान झाले होते.

मुरजी पटेल यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका महिलेवर अन्याय होऊ नये, असे माझे मत आहे. पुढे जाऊन ऋतुजा लटकेंची तृप्ती सावंत करू नये. मी आता मतदान करत आहे. अंधेरीतील नागरिकांनी देखील मतदान करण्यासाठी बाहेर पडावे, असे आवाहन पटेल यांनी केले.भाजपा आणि शिंदे गटाकडून नोटाला मतदान करण्याचा प्रचार करण्यात आल्याचा आरोप लटकेंनी केला होता. यावर आम्ही नोटाला मतदान करण्याचा प्रचार केला नाही. कोणाला मत द्यायचे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, असे पटेल म्हणाले. 

टॅग्स :andheri-east-acअंधेरी पूर्वUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना