शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अंधेरीत रंगणार मतयुद्ध! हायकोर्टात ठाकरे गटाला दिलासा; ऋतुजा लटके आज भरणार उमेदवारी अर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 06:25 IST

भाजप-शिंदे गटाचे मुरजी पटेलही रिंगणात उतरणार, आणखी तिघांचे अर्ज दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना गुरुवारी उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. लटके यांनी महापालिकेच्या नोकरीचा दिलेला राजीनामा शुक्रवारी सकाळी ११पर्यंत स्वीकारून तसे पत्र त्यांना देण्याचे आदेश न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले. त्यामुळे लटके आज, शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरतील. दरम्यान, भाजप-शिंदे गटाचे मुरजी पटेलही रिंगणात उतरणार असून, त्यावर आज शिक्कामोर्तब होईल. याशिवाय आणखी तिघांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे अंधेरी येथे मतयुद्ध रंगण्याची शक्यता आहे. 

काय म्हणाले न्यायालय? एका लिपिकाला राजीनामा द्यायचा आहे, त्यांना निवडणूक लढायची आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची १४ ऑक्टोबर शेवटची तारीख आहे. विशेषाधिकार केव्हा वापरणार? अशी विचारणा न्या. नितीन जामदार व न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने महापालिकेकडे केली.तुमच्याकडे विशेषाधिकार असताना आमच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचायलाच नको होते. हे केवळ राजीनामा पत्र आहे. एका लिपिकाने राजीनामा दिला आहे, त्यास ‘हो’ किंवा ‘नाही’ असे उत्तर द्या. आमच्यावर भार टाकू नका, अशा शब्दांत न्यायालयाने फटकारले.

का झाला होता पेच?शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर अंधेरीत पोटनिवडणूक होत आहे. ठाकरे गटाने दिवगंत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, लटके यांनी पालिकेच्या नोकरीचा दिलेला राजीनामा स्वीकारण्यात न आल्याने तांत्रिकदृष्ट्या अडचण निर्माण झाली होती. त्याविरोधात लटके यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर लटके यांच्या बाजूने निकाल लागला. त्यानंतर लटके म्हणाल्या की, आज मला न्यायदेवतेने न्याय दिला आहे. मी पतीचा वारसा पुढे घेऊन जाणार आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेHigh Courtउच्च न्यायालय