कोल्हापुरात आॅनर किलिंग!

By Admin | Updated: December 18, 2015 01:06 IST2015-12-18T01:06:43+5:302015-12-18T01:06:43+5:30

बहिणीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून दोन सख्ख्या भावांनी बुधवारी रात्री नवदाम्पत्याचा खून केल्याची संतापजनक घटना येथील कसबा बावडा परिसरात घडली.

Andher Killing in Kolhapur! | कोल्हापुरात आॅनर किलिंग!

कोल्हापुरात आॅनर किलिंग!


कोल्हापूर : बहिणीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून दोन सख्ख्या भावांनी बुधवारी रात्री नवदाम्पत्याचा खून केल्याची संतापजनक घटना येथील कसबा बावडा परिसरात घडली. कुटुंबाच्या खोट्या प्रतिष्ठेपायी सख्खे भाऊच बहिणीच्या जिवावर उठल्याचे सकृत्दर्शनी स्पष्ट झाले आहे.
गणेश कॉलनीमध्ये इंद्रजीत श्रीकांत कुलकर्णी (२८) व मेघा (२१) या नवदाम्पत्याचा गणेश महेंद्र पाटील (२०), त्याचा सख्खा भाऊ जयदीप (१९, दोघे रा. थेरगाव) व मित्र नितीन रामचंद्र काशीद (२२, सातवे, ता. पन्हाळा) यांनी चाकूने भोसकून निर्घृणपणे खून केला. शाहूपुरी पोलिसांनी बुधवारी मध्यरात्रीच आरोपींना अटक केली. गुरुवारी न्यायालयाने त्यांना २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मेघाचे बच्चे सावर्डे (ता. पन्हाळा) येथील इंद्रजीत कुलकर्णीबरोबर प्रेमसंबंध जुळले होते. त्यांच्या प्रेमविवाहाला कुटुंबाचा तीव्र विरोध होता. तरीही, त्यांनी दीड वर्षापूर्वी लग्न केले. ते दोघे कसबा बावड्यातील गणेश कॉलनीत भाड्याने घर घेऊन राहत होते. बुधवारी गणेश पाटीलच्या नातेवाइकांच्या विवाहात मेघाच्या लग्नाची चर्चा झाली. त्यातून गणेश व जयदीप यांचा राग अनावर झाला. रात्री १० वाजता दोघे जण त्यांचा मित्र नितीन काशीदला घेऊन दुचाकीवरून बहिणीकडे गेले. नितीन रस्त्यावर टेहळणी करीत थांबला होता. गणेश व जयदीप मेघाच्या घरात गेले.
मेघाने आपले भाऊ आल्याचे पाहताच इंद्रजीतला दूध व इतर साहित्य आणण्यासाठी बाजारात पाठविले. इंद्रजीत बाहेर गेल्यावर मेघा चहा करण्यासाठी स्वयंपाक खोलीत गेली. त्या वेळी दोघा भावांनी तिच्या तोंडात बोळा कोंबून स्नानगृहात नेऊन तिच्यावर चाकूहल्ला केला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. थोड्या वेळाने इंद्रजीत घरी आल्यानंतर
गणेश व जयदीपने त्याच्यावरही चाकूने हल्ला केला. इंद्रजीत किंचाळल्याने घरमालकीण वंदना माधव जिन्याजवळ आल्या. त्या वेळी रक्ताने माखलेला चाकू घेऊन दोघे जण पळाल्याचे त्यांनी पाहिले. (प्रतिनिधी)

Web Title: Andher Killing in Kolhapur!