शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

...अन् अधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास; ४८ तासांपासून होते गॅसवर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 3:07 AM

पवारांनी काढली ईडीच्या गुन्ह्यातील हवा

मुंबई : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात जाण्याचा नियोजित दौरा रद्दकेल्याने इडीच्या अधिकाऱ्यांनी अक्षरश: सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यांच्या भेटीमुळे उद्भवणारी राजकीय परिस्थिती आणि दिल्लीतील वरिष्ठांचा त्याबाबत होणारा समज, यातून आपसुकच सुटका झाल्याने जवळपास ४८ तासांनंतर अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यांवरील तणाव दूर झाला.राज्य सहकारी बॅँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याने पवार यांनी बुधवारी ‘बिन बुलाये मेहमान’ बनून ईडीच्या कार्यालयात स्वत:हून जाण्याचे जाहीर केले. तेव्हापासून या संभाव्य घटनेला कसे सामोरे जायचे? याबाबत अधिकाºयांत संभ्रम होता. कार्यालयात हजर राहण्याची आवश्यकता नाही, तूर्तास चौकशीची गरज नसल्याचे कळवूनही पवार यांनी भूमिका बदलली नव्हती.त्यामुळे ते आले तर त्यांचे म्हणणे ऐकून घेणे किंवा त्यांनी निवेदन दिल्यास ते स्वीकारायचे, त्यांचा जबाब किंवा गैरव्यवहाराविषयी कोणतीही विचारणा करावयाची नाही, असा निर्णय अधिकाºयांनी घेतला. मात्र त्यामुळे या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटण्याच्या शक्यतेने अधिकाºयांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण होते. त्यामुळे अधिकारी सकाळी १० पूर्वीच कार्यालयात हजर झाले. मात्र मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी पवार यांच्या चर्चगेट येथील ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी जात त्यासंबंधी केलेली शिष्टाई यशस्वी ठरली. आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ईडीकडे जाणार नसल्याचे जाहीर करीत पवार पुण्याकडे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले.पवारांनी काढली ईडीच्या गुन्ह्यातील हवाईडीने शरद पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यापासून गेल्या तीन दिवसांपासून राज्यात खळबळ उडाली होती. ईडीने राजकीय दबावाखाली ही कारवाई केल्याची उघड टीका विरोधी पक्षांबरोबरच शिवसेना आणि सामान्य नागरिकांतूनही व्यक्त होत होती. मात्र पवार यांनी स्वत: कार्यालयात जाण्याची भूमिका घेत हे अस्त्र त्यांच्यावर उलटविले. त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे या गुन्ह्याची हवाच निघून गेल्याचे मत ईडीतील सूत्रांकडून व्यक्त करण्यात आले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय