शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सुनील प्रभूंनी दिलेला ईमेल बनावट, अनिल देसाईंनी एक पत्र दिलेले; शिंदे गटाच्या वकिलांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 19:34 IST

Mla Disqualification hearing: ज्या ईमेल आयडीवर पत्र सादर केले तो एकनाथ शिंदे यांचा ई-मेल आयडी नाहीय. त्याचा रीड बॅक देखील ते सादर करत नाहीत. - जेठमलानी

शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणीवरील उलटतपासणी आज पूर्ण होऊ शकलेली नाहीय. विधासभेतील सुनावणीमध्ये एकनाथ शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांची आजही उलटतपासणी घेतली. यामध्ये त्यांनी प्रभू यांनी साक्ष बदलत ईमेल वरून पत्र पाठविल्याच्या दाव्यालाच लक्ष्य केले आहे. काल प्रभूंनी जो ईमेल आणला तो बनावट आहे, असा दावा जेठमलानी यांनी केला आहे. 

काल सादर करण्यात आलेल्या ई-मेल संदर्भात अर्ज दिला आहे. खूप सारे बोगस कागदपत्रे आहेत. इतरही अनेक कागदपत्रे बनावट आहेत, पण आमचा फोकस हा ईमेलवरच आहे, असे जेठमलानी म्हणाले. तसेच प्रभू यांनी बऱ्याच प्रश्नांना ते रेकॉर्डवर आहे, अशीच उत्तरे दिल्याचे ते म्हणाले. 

ईमेलबाबत अनेक गोष्टी विरोधाभासी आहेत. जर या कोर्टात काही चुकीची गोष्ट झाली असेल तर सगळे पुरावे एकत्र करून कोर्ट आपला निकाल देईल. पक्ष विरोधी कारवाईची काय प्रक्रिया आहे, कारणे दाखवा नोटीस दिली जाते का नाही सुनावणी घेत की नाही, यावर त्यांचे एकच उत्तर होते की जे काय आहे ते रेकॉर्डवर आहे. 4 एप्रिलला अनिल देसाई यांनी एक लेटर दिले आहे. पण ते निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर नाही, असाही दावा जेठमलानी यांनी केला. 

23 जानेवारी 2018 ला झालेल्या निवडणुकीचे निकाल आणि शिवसेनेच्या घटनेत ज्या काही सुधारणा करण्यात आल्या त्या सगळ्या या पत्रात होत्या. पण हे देखील एक बनावट डॉक्युमेंट आहे. सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान देखील हे डॉक्युमेंट्स सादर केले नव्हते. निवडणूक आयोगातील सुनावणीत देखील हे डॉक्युमेंट नव्हते. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल अपीलमध्ये देखील हे डॉक्युमेंट नाहीय, पहिल्यांदाच ते समोर आले आहे, असे जेठमलानी यांनी सांगितले. 

त्यांच्या केसचा आधार असलेली सगळी कागदपत्रे बनावट आहेत व ती कधीही पाठविली गेली नाहीत. त्यावरील सह्या खोट्या आहेत किंवा ती आता बनवली आहेत, असा दावा जेठमलानी यांनी केला. ज्या ईमेल आयडीवर पत्र सादर केले तो एकनाथ शिंदे यांचा ई-मेल आयडी नाहीय. त्याचा रीड बॅक देखील ते सादर करत नाहीत. ते म्हणतात त्यांनी पाठवले पण त्यांना मिळाले की नाही हे माहीत नाही. आता उद्या व्हीपच्या उल्लंघनासंदर्भात सुनावणी होईल, उद्या मी उलट तपासणी पूर्ण करेन, असे जेठमलानी म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना