शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

इन्फ्लुएन्झा, कोरोना मैदानात; एकाचवेळी प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 06:25 IST

हा विषाणू जुनाच असला तरी तज्ज्ञांनी मास्कचा आग्रह धरला आहे. त्याच्या जोडीने कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने चिंतेत भर पडली आहे.

मुंबई  : गेल्या काही दिवसांत इन्फ्लुएन्झा या आजाराने सर्वांना त्रस्त केले आहे. त्याच्याच जोडीला आता कोरोनाही हळूहळू डोके वर काढू लागला आहे. दोन्ही आजाारंनी पुन्हा उचल खाल्ल्याने सर्वत्र चिंता आणि भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच आलेख भुईसपाट झाला होता. कोरोना संपल्यामुळे सुटकेचा नि:श्वास टाकला जात असताना इन्फ्लुएन्झा विषाणूच्या एच ३ एन २ या उपप्रकाराने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. हा विषाणू जुनाच असला तरी तज्ज्ञांनी मास्कचा आग्रह धरला आहे. त्याच्या जोडीने कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने चिंतेत भर पडली आहे.

वैद्यकीय तज्ज्ञांचे मते, एच३ एन२ आणि कोरोना हे दोन्ही विषाणू नागरिकांच्या श्वसन व्यवस्थेवर हल्ला करतात. विशेष म्हणजे, दोन्ही विषाणूंमुळे होणाऱ्या आजाराच्या लक्षणांत कमालीचा एकसारखेपणा आहे. या विषाणूमुळे होणाऱ्या  आजाराची लक्षणे सारखी असून त्यामध्ये खोकला,  घशात खवखव, सर्दी, धाप लागणे आणि ताप या लक्षणांचा प्रामुख्याने समावेश आहे. तसेच या सर्व लक्षणांचा सहव्याधी असलेल्या रुग्णांना अधिक त्रास होतो. त्याकरिता ज्येष्ठांची आणि लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे.

प्रत्येक विषाणूमध्ये कालांतराने काही प्रमाणात जनुकीय बदल होत असतात. आजही या परिस्थितीला साधारण परिस्थिती म्हणूनच पाहत आहोत. जी काही दरवर्षी आम्ही औषधे या आजाराला देत आहोत तशीच देत आहोत. नागरिक अधिक प्रमाणात जागरूक झाल्याने याची सध्या चर्चा होत आहे. बाकी सगळे आहे तसेच सुरू आहे. नागरिकांनी तर मुळीच घाबरण्याची गरज नाही.सध्या जो काही इन्फ्लुएंझा ए चा उपप्रकार दिसत आहे तो अगदी जुना आहे. तसेच कोरोना आपल्याकडे यापूर्वीही होत आणि आजही आहे. त्यावर कोणत्या प्रकारचे उपचार करायचे.     - डॉ. जलील पारकर,    लीलावती हॉस्पिटल

रुग्णांना आता पालिका रुग्णालयांचा सहाराशहर आणि उपनगरांतील जेजे, जीटी, कामा आणि सेंट जाॅर्ज रुग्णालयांत संपाच्या पाचव्या दिवशीही रुग्णसेवा रखडल्याचे चित्र होते, रुग्णांनीही आता शहर व उपनगरांतील पालिका रुग्णालयांमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केल्याने शनिवारी शासकीय रुग्णालयांत शुकशुकाट दिसून आला. शासकीय रुग्णालयांमध्ये संपामुळे सेवेवर झालेला परिणाम टाळण्यासाठी पालिका प्रशासनाकडून मनुष्यबळाचे साहाय्य घेतले आहे.

एच३ एन२ चे रुग्ण यावेळी अधिक प्रमाणात दिसत आहे. पूर्वी फार या विषाणूसाठी फार चाचण्या केल्या जात नसत. मात्र, यावेळी त्या केल्या जात आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत फार मोठी वाढ नाही. नागरिकांनी मात्र काळजी घेतली पाहिजे.         - डॉ. वसंत नागवेकर, साथरोग तज्ज्ञ, एच एन रिलायन्स हॉस्पिटल

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्र