शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कृतज्ञतेचा अमृतमहोत्सव

By admin | Updated: December 13, 2015 02:47 IST

माझ्यासारखा एक सामान्य माणूस इथपर्यंत पोहचतो, हा भारतीय लोकशाहीचा चमत्कार आहे. त्यामुळे अशा या लोकशाहीला मजबूत करणे, तिचा सन्मान वाढविणे आणि शेवटच्या

मुंबई : माझ्यासारखा एक सामान्य माणूस इथपर्यंत पोहचतो, हा भारतीय लोकशाहीचा चमत्कार आहे. त्यामुळे अशा या लोकशाहीला मजबूत करणे, तिचा सन्मान वाढविणे आणि शेवटच्या व्यक्तिपर्यंत लोकशाहीची बांधिलकी पोहचविण्याचे काम यापुढील आयुष्यात करणार असल्याची कृतज्ञ ग्वाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नेहरु सेंटर येथील नागरी सत्काराला उत्तर देताना दिली. शरद पवार यांचा पंचाहत्तरीनिमित्त मुंबईतील नेहरु सेंटरमध्ये समाजाच्या सर्वच स्तरातील मान्यवर व पवारप्रेमींनी मोठी गर्दी केली. व्यासपीठावर पवारांप्रती कृतज्ञ भाव व्यक्त करीत आठवणी जागविणारे नेते आणि मान्यवर. तर, प्रेक्षागृहात पहिल्या रांगेत बसून सपत्नीक हा सोहळा अनुभवणारे पवार, असा अनोखा कार्यक्रम नेहरू सेंटरमध्ये पाहायला मिळाला. या कृतज्ञता सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना रिलायन्सचे मुकेश अंबानी म्हणाले की, ‘फक्त आणि फक्त उद्योग-व्यवसाय असे एकांगी आयुष्य नसावे. जीवनात समतोल हवा. मी राजकारणी असूनही कला-साहित्याची आवड बाळगतो, असा मौलिक सल्ला पवारांनी आपणास दिला. त्यांच्यामुळेच आयुष्यात समतोल साधू शकलो, असे अंबानी म्हणाले. तर, पाठिशी एक आमदार असणारा इथे कसा, बरं आला तर मग थेट व्यासपीठावर कसा, असे प्रश्न अनेकांच्या मनात सध्या असतील. पण याबाबत तुम्ही सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेलांना विचारा, अशी सुरुवात कर मनसेप्रमुख राज ठाकरेंनी सभागृहाचा नूरच बदलून टाकला. राज ठाकरेंचे हे मिश्किल भाषण सुरु असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सभागृहात प्रवेश करत होते. तेंव्हा ‘हे पाहा आमचे बंधु आले’, असे म्हणत राज त्यांचे स्वागत करत छान ‘पॉझ’ घेतला. ‘काय टायमिंग आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. व्यासपीठावर स्थानापन्न होण्यापूर्वी उद्धव हस्तांदोलनासाठी राज यांच्या जवळ गेले. पवारांच्या सोहळ्यातील क्षणभराच्या या उद्धव-राज भेटीने उपस्थित भारावून गेले. यानंतर बोलताना राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे म्हणाले, पवारांनी सार्वजनिक कामात कधीच पक्षपात केला नाही. ९३ चे बॉम्बस्फोट असो अथवा किल्लारी भूकंप महाराष्ट्राला सावरण्याचे काम पवारांनी केले. दस्तुरखुद्द माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या या कौशल्याची दखल घेत आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी पवारांवर सोपविली. याहून मोठे प्रशस्तीपत्रक कोणते असेल. राज यांच्या वक्तव्याचा धागा पकडून ते म्हणाले, राज तुमच्याकडे एक आमदार असला म्हणून काय झाले. आमचे तर दोनच (खासदार) होते, वेळ बदलेल. दिल्लीपर्यंत जाल, वाटल्यास एकत्र जाऊ. समोर पवारांचा आदर्श ठेवा. त्यांच्या या वक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकला. निवडणुकीत एकमेकांचे वाभाडे काढणारे सगळे नेते आज व्यासपीठावर पवारांचे कौतुक करतायत. याचे काहींना आश्चर्य वाटेल. पण, हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. प्रत्येक ठिकाणी दुस्वास करणे, ही आपली परंपरा नाही. अविश्रांत कष्ट ही पवारांची ओळख आहे. ते कधी झोपत असतील का असा प्रश्न मला पडतो. अनेकांची झोप उडविणाऱ्या पवारांनी स्वत: जागे राहात अनेकांना जागते रहो, करायला लावले, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ४० वर्षांच्या राजकीय प्रवासात शरद पवारांनी करंगळी पकडली आणि एक सब-इन्स्पेक्टर देशाचा गृहमंत्री कसा झाला, हेही मला उमगले नाही. त्यांनी राजकारणात अनेकांना घडविले. आम्हाला घडविले. महाराष्ट्र घडवायचा असेल तर टीकेला महत्व न देता लोकांना सोबत घ्यायची शिकवण दिली.पवारसाहेब तुम्ही आमचे खरे नेते आहात. आम्ही तुमचे ‘फॉलोअर’ असे भावोद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी काढले. तर, पवार हे खरे राष्ट्रसेवक आहेत. देशाच्या प्रत्येक प्रधानमंत्र्यांने त्यांचे सहाय्य घेतले. असा नेता एक-दोन वर्षात घडत नाही. ते तपस्येचे फळ आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी काढले. यावेळी राज्यपालांनी अस्सल मराठीत आपल्या दोन इच्छा बोलून दाखविल्या. एक म्हणजे पवारांना दीर्घायुष्य लाभावे आणि वयाची शंभरी पार करावी. आणि दुसरी म्हणजे शंभरीचा सोहळा पाहाण्याचे भाग्य आम्हाला लाभावे. (प्रतिनिधी)राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छावाढदिवसानिमित्त शरद पवार यांनी रविवारी सकाळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्यातील आपल्या चाहत्यांची, कार्यकर्त्यांची भेट घेतली. सकाळी ९ ते दपारी १ असे सलग चार तास राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी पवारांवर अक्षरश: शुभेच्छांचा वर्षाव केला. पवारांनी न थकता प्रत्येकाचे हसतमुखाने या शुभेच्छांचा स्वीकार केला. कुणाची आस्थेने चौकशी तर कुणाची फोटोची हौस पवारांनी न कंटाळता भागविली. पवारांची कन्या खा. सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सचिन अहिर आदी नेते उत्साहाने कार्यक्रमाची व्यवस्था पाहत होते. सर्वच नेते लगबगीने सभागृहभर फिरत ‘सारं सुरळीत होतंय ना’ याकडे लक्ष देत होते.