शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीची फॅशन डिझायनर रुपल ‘मिसेस इंडिया अर्थ’च्या फायनलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 19:18 IST

प्रतीष्ठेची मानली जाणारी ‘मिसेस इंडिया अर्थ’ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत अमरावतीची रुपल गुडढे-बोके हिने स्थान मिळविले आहे.

अमरावती, दि. 20 : प्रतीष्ठेची मानली जाणारी ‘मिसेस इंडिया अर्थ’ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत अमरावतीची रुपल गुडढे-बोके हिने स्थान मिळविले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त असणारी ही सौंदर्य स्पर्धा भारतीय वंशज असणा-या सौभाग्यवतींसाठीच आयोजित केली जाते. आठ वर्षांच्या मुलीची आई असणारी रुपल ही पेशाने फॅशन डिझायनर आहे. बारावीपर्यंतचे शिक्षण अमरावती येथे झाले. यानंतर तिने सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केले. सन २००७ साली सागर बोके यांच्याशी तिचा विवाह झाला. जगभरातून मिसेस इंडिया अर्थ या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या ४८ स्पर्धकांमध्ये रुपलने आपली निवड सार्थ ठरवीत अंतिम फेरी गाठली. ६ आॅक्टोबर रोजी स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी निवड झालेली ती पहिली अमरावतीकर ठरली आहे. रुपल येथील विनोद व अलका गुडधे यांंची कन्या आहे. सध्या ती तिचे पती सागर बोके यांच्यासह मुंबईत स्थायिक आहे.

मागील पाच वर्षांपासून ती फॅशन डिझायनिंग क्षेत्रात करीअर करीत असून टीव्ही मालिका व अनेक मोठ्या ईव्हेंटसाठी वस्त्रे डिझाईन केली आहेत. नुकताच तिने आपला नवीन ब्रँडही बाजारात आणला आहे.  मी सर्वप्रथम एक आई आहे. त्यानंतर गृहिणी व उद्योजग आहे. ज्या क्षेत्रात काम करायचे आहे त्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी प्रयत्न करीत राहावे, माझ्या यशाचे श्रेय पती, आई-वडील व माझी मुलगी यांना आहे असे तिने ‘लोकमत’ला सांगितले.