शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती: पीडीएमसीत 'परिवर्तन'; ‘डीन’चा राजीनामा, सोमवंशींचा मार्ग प्रशस्त : वसंत लवणकरांकडे प्रभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 19:35 IST

श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळात तब्बल दहा वर्षांनंतर झालेल्या परिवर्तनाचा पहिला फटका डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालया (पीडीएमसी)च्या अधिष्ठात्यांना

अमरावती, दि. 17 - श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळात तब्बल दहा वर्षांनंतर झालेल्या परिवर्तनाचा पहिला फटका डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालया (पीडीएमसी)च्या अधिष्ठात्यांना बसला आहे. स्वत:ची संभाव्य गच्छंती ओळखून अधिष्ठाता दिलीप जाणे यांनी उशिरा रात्री त्यांच्या पदाचा राजीनामा नव्या कार्यकारिणीकडे सोपविला. त्यांचा हा राजीनामा स्वीकृत करण्यात आला आहे. तूर्तास अधिष्ठातापदाचा पदभार वसंत लवणकर यांच्याकडे देण्यात आला आहे. 

श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे संचालित डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय रूग्णालय व महाविद्यालयाच्या (पीडीएमसी) अधिष्ठातापदाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असताना मावळत्या कार्यकारिणीने अभय दिल्याने त्या पदावर दिलीप जाणे कार्यरत होते. विशेष म्हणजे जाणे यांना हटवून पद्माकर सोमवंशी यांना अधिष्ठातापदी रूजू करून घेण्याचे आदेश आरोग्य विद्यापीठ व नागपूर खंडपीठाने दिले होते. मात्र, शिवाजी शिक्षण संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष अरुण शेळके यांनी ते आदेश डावलत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. चार दिवसांपूर्वी शिवाजी शिक्षण संस्थेचे सुकाणू हर्षवर्धन देशमुख यांच्याकडे आले आहेत. देशमुख यांच्या नेतृत्वातील परिवर्तन पॅनेलने नऊपैकी आठ जागा जिंकून शिवाजी संस्थेवर निर्विवाद वर्चस्व गाजविले. हर्षवर्धन देशमुख आणि नवे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले हे सोमवंशी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले होते. आता तेच कार्यकारिणीत आल्याने गच्छंती अटळ असल्याचे ओळखून दिलीप जाणे  यांनी आधीच पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. या राजीनाम्याने सोमवंशी यांचा मार्ग प्रशस्त झाला असला तरी त्यात काही तांत्रिक अडचणी आहेत. 

मागील अनेक दिवसांपासून राजीनामा देण्याच्या मन:स्थितीत होतो. शनिवारी रात्री त्याला मूर्तरुप दिले. राजीनाम्याला संस्थेतील परिवर्तनाची पार्श्वभूमि नाही. -दिलीप जाणे, माजी अधिष्ठाता, पीडीएमसी