शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवनीत राणा यांना 'हनुमान चालिसे'चं फळ मिळणार? पती रवी राणा शिंदे सरकारमध्ये मंत्री होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 14:27 IST

या दांपत्यने उद्धव ठाकरे यांना आव्हान देत  'मातोश्री'बाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणाही केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. यानंतर, या दंपत्याला अटकही करण्यात आली होती.

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी हनुमान चालिसेच्या मुद्द्यावर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात शड्डू ठोकला होता. एवढेच नाही, तर या दांपत्यने उद्धव ठाकरे यांना आव्हान देत  'मातोश्री'बाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणाही केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. यानंतर, या दंपत्याला अटकही करण्यात आली होती. मात्र, आता त्यांना 'हनुमान चालिसे'चे फळ मिळण्याची शक्यता आहे. राज्यात उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता असून यात रवि राणा यांनाही संधी मिळू शकते. रवि राणा यांनीही एकनाथ शिंदे सरकारला आपला पाठिंबा दिला आहे.

मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणण्याच्या राणा दांपत्याच्या घोषणेनंतर, मुंबई पोलिसांनी 23 एप्रिलला नवनीत राणा आणि रवि राणा या दोघांनाही अटक केली होती. मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर, वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व निर्माण केल्याच्या आरोप केला होता. या दांपत्यावर खार पोलीस ठाण्यात कलम 153 (A), 34, IPC r/w 37(1) 135 मुंबई पुलीस अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यानंतर, राणा दांपत्याने उद्धव ठाकरेंवर संबंधित घटना घडवून आणल्याचा आरोप करत, पलटवार केला होता. यावेळी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आम्हाला त्रास देण्याचा आदेश दिला आहे, असा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. तर त्यांचे पती रवी राणा यांनी, उद्धव ठाकरे यांना केवळ राजकीय फायदा हवा आहे, असे म्हटले होते.  

टॅग्स :Ravi Ranaरवि राणाnavneet kaur ranaनवनीत कौर राणाEknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारण