शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

अमरावतीच्या आयजींवर शिस्तभंग?

By admin | Updated: November 9, 2016 05:18 IST

मराठा असल्याने छळ होत आहे, त्यामुळे मी आत्महत्येचा विचार करत आहे, अशी धमकी देणारे अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांना

मुंबई/अमरावती : मराठा असल्याने छळ होत आहे, त्यामुळे मी आत्महत्येचा विचार करत आहे, अशी धमकी देणारे अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांना पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी तातडीनेमुंबईला पाचारण केले आहे, तर गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के.पी. बक्षी यांनी यासंदर्भात अहवाल मागविला आहे. एकूण घडामोडी बघता जाधव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे.आयजी जाधव यांनी रविवारी रात्री काही पोलिस अधिकारी व मित्रांना व्हॉटसअ‍ॅप संदेश पाठवून ‘मराठा असल्याने माझा छळ होतोय आणि या छळाला कंटाळून मी आत्महत्या करेन. आत्महत्येसाठी डीजीपी जबाबदार राहतील’, अशी धमकी दिल्याने पोलीस यंत्रणेत एकच खळबळ उडाली. यासंदर्भात मंगळवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच डीजीपी माथूर यांनी जाधव यांच्याशी भ्रमणध्वनीवरून अर्धा तास चर्चा केली. सविस्तर चर्चेकरिता त्यांनी जाधव यांना मुंबईला पाचारण केले आहे. लवकरच जाधव डीजीपींच्या भेटीला जाणार असल्याची माहिती आहे. पोलिस दलाच्या आचारसंहितेनुसार वरिष्ठांवर जाहीरपणे आरोप करता येत नाहीत. त्यामुळे या प्रकरणात जाधव यांच्याविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के.पी.बक्षी यांनी पत्रकारांना सांगितले की जाधव यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात अहवाल देण्यास माथूर यांना राज्य शासनाने सांगितले आहे. ते लवकरच अहवाल देतील. माथूर यांना जाधव प्रकरणी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आल्याची बातमी काही वृत्तवाहिन्यांनी दिली होती. तथापि, पोलीस गृहनिर्माणबाबत राज्य मंत्रिमंडळासमोर आज सादरीकरण होते आणि त्यासाठी माथूर यांना बोलविलेले होते. हे पूर्वनियोजितच होते, असा खुलासा माहिती व जनसंपर्क विभागाने केला. सांगली : माझ्याकडे गृह खाते होते, त्यावेळी पोलिसांमध्ये अंडरकरंट प्रांतीयवाद होता. मराठा नव्हे, तर मराठी भाषिक पोलिसांना वेगळी वागणूक दिली जात होती. त्यामुळे विठ्ठल जाधव यांनी केलेल्या तक्रारीची शहानिशा गृह खात्याने केली पाहिजे, असे मत राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले की, उत्तर आणि दक्षिण भारतीय पोलिस व स्थानिक मराठी भाषिक पोलिसांमध्ये वादाचा अंतर्प्रवाह होता. तो उघडपणे नसला तरी, त्याचे अस्तित्व जाणवत होते. जाधव यांनी अशाप्रकारची तक्रारी केली असेल, तर निश्चितपणे काही तरी घडले असणार. वरिष्ठ पदावरील व्यक्ती अशी खदखद व्यक्त करीत असेल, तर त्याची दखल घेतली पाहिजे.