Amol Mitkari Vidhan Sabha Clash: ...तर यापेक्षाही मोठा राडा घालू; अमोल मिटकरींचा शिंदे सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 12:53 PM2022-08-24T12:53:23+5:302022-08-24T13:07:56+5:30

Vidhan Sabha shinde group mla vs ncp mla clash: मुख्यमंत्र्यांनी नवख्या आमदारांना समज द्यावी. त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी नाहीय. जे तरुण राजकारणात येऊ पाहतायत त्यांच्यासमोर वेगळे चित्र जाऊ नये, असे मिटकरी म्हणाले.

Amol Mitkari Vidhan Sabha shinde group mla vs ncp mla clash: ...then will make bigger Clash; Amol Mitkari's warning to the Eknath Shinde government | Amol Mitkari Vidhan Sabha Clash: ...तर यापेक्षाही मोठा राडा घालू; अमोल मिटकरींचा शिंदे सरकारला इशारा

Amol Mitkari Vidhan Sabha Clash: ...तर यापेक्षाही मोठा राडा घालू; अमोल मिटकरींचा शिंदे सरकारला इशारा

googlenewsNext

विधानसभा अधिवेशनाचा आजचा दिवस इतिहासातील सर्वात वाईट दिवस ठरला आहे. शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे आमदार एकमेकांना पायऱ्यांवरच भिडले. शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी आपल्याला शिवीगाळ, धक्काबुक्की केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. तर भरत गोगावले यांनी, ते कसले धक्काबुक्की करतायत, आम्हीच केली, पुन्हा आमच्या अंगावर आले तर शिंगावर घेऊ, असे उघडपणे म्हटले आहे. 

Vidhan Sabha Adhiveshan: महेश शिंदेंनी शिवीगाळ, धक्काबुक्की केली; अमोल मिटकरींचा गंभीर आरोप

यावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी घोषणाबाजी केली तेव्हा आम्ही त्यांना कोणतेही प्रत्यूत्तर दिले नाही. अजित पवारांनी आमदार भिडतायत ते पाहून आम्हाला आत नेले. आम्ही आत गेलो, तेव्हा तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटले. त्यांच्या वाह्यात आमदारांची तक्रार केली. झालेला प्रकार अत्यंत चुकीचा होता. आम्ही त्याचे समर्थन करत नाही. आम्ही शांततेची प्रदर्शन केले, त्यांनी विकृतीचे प्रदर्शन केले. शिवीगाळ काय केली हे सांगणे योग्य नाही, ते आई, बहीणीवरून अर्वाच्च बोलले. 

विलास लांडे मला म्हणतात, मिटकरी तुम्ही पांडुरंगाचे लेप लावता. तो माझा अधिकार आहे ना, जर तुमच्या आई बहीणींवरून शिवीगाळ करत असेल तर आम्हीही घालू शकतो. पण आम्ही तसे केले नाही. मी त्या आमदारांना एवढे ओळखत नाही. ते नवखे आलेत, असे मिटकरी म्हणाले. पन्नास खोके, एकदम ओके हे काल दीपक केसरकरांच्या जिव्हारी लागले. काल त्यांनी उत्तर दिले. ठिक आहे, त्यांनी उत्तर दिले, पण ४९ जणांनी पण द्यावे ना. खोके काय औषधाचे पण असू शकतात, असा टोलाही मिटकरी यांनी लगावला. 

'५० खोके, एकदम ओके'वरून राडा! विधीमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे गट-राष्ट्रवादीचे आमदार भिडले

रामाच्या नावे सरकार चालवत आहेत. हे आमदार सख्ख्या भावाशी भांडून आलेत. त्यांनी त्या भावांना पाच पाच एकर जमिन द्यावी ना, आईवडिलांची सेवा करावी. हा राडा नाही. जर सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला नाही, तर आम्ही यापेक्षाही मोठा राडा घालू, असा इशारा मिटकरी यांनी दिला.  

सरनाईकांनी सीसीटीव्ही फुटेज पहा असे म्हटलेय. मुख्यमंत्र्यांनी नवख्या आमदारांना समज द्यावी. त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी नाहीय. जे तरुण राजकारणात येऊ पाहतायत त्यांच्यासमोर वेगळे चित्र जाऊ नये, असे मिटकरी म्हणाले. सत्ताधाऱ्यांनी शक्तीप्रदर्शन आणि मस्तीप्रदर्शन केले, असा आरोपही त्यांनी केला. 

Web Title: Amol Mitkari Vidhan Sabha shinde group mla vs ncp mla clash: ...then will make bigger Clash; Amol Mitkari's warning to the Eknath Shinde government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.