शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Monsoon Session 2022 : 'विचारांची लढाई विचारांनीच लढावी'; अधिवेशनातील गोंधळावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 16:49 IST

आज अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याने जोरदार राडा झाला.

मुंबई: आज पावसाळी अधिवेशनाचा (Mansoon Session) पाचवा दिवस आहे. सकाळी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याने जोरदार राडा झाला. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात 'पन्नास खोके एकदम ओक्के...' अशा घोषणा दिल्या. या घोषणांमुळे सत्ताधारी आक्रमक झाले, यावेळी आमदार महेश शिंदे (MLA Mahesh Shinde) आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्यामध्ये चांगलीच जुंपली. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले खडसे?

विरोधकांकडून 'पन्नास खोके एकदम ओक्के...' या घोषणेनंतर सत्ताधारी आमदारांनी 'लवासातील खोके सिल्वह ओक ओक्के', 'वाझेचे खोक्के मातोश्री ओक्के', अशा घोषणा सुरू केल्या. यावेळी महेश शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्या धक्काबुक्की झाल्याचे पहायला मिळाले. यावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, 'आज अधिवेशनादरम्यान धक्काबुक्कीचा प्रकार घडला. पण, विचारांची लढाई विचारांनीच झाली पाहिजे. एकोंमेकांच्या अंगावर जाणे किंवा हात उगारणे हे काय योग्य नाही. अधिवेशन काळात विधानभवनाच्या सर्व कोड ऑफ कंडक्टचे पालन झाले पाहिजे. निषेध किंवा आंदोलन हे शांततेच्या मार्गाने व्हायला हवे,' असे खडसे म्हणाले.

विधीमंडळित नेमकं काय झालं?विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. विरोधी पक्षाचे आमदार विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसले. तर, सत्ताधारी पक्षाचे आमदारही राष्ट्रवादी-शिवसेनेविरोधात नारेबाजी करत होते. अधिवेशनापूर्वी शिंदे गटाचे आमदार पायऱ्यांवर घोषणाबाजी करत असताना विरोधकही तेथे उपस्थित झाले. त्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात राडा झाला.  या गोंधळात शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी हे एकमेकांच्या अंगावर धावून गेले. मात्र इतर आमदारांनी मध्यस्थी करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.  

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेAmol Mitkariअमोल मिटकरीEknath Shindeएकनाथ शिंदे