शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

KBC 12 : 'मनुस्मृती'वरील प्रश्नावरून वाद; विवेक अग्निहोत्री म्हणाले, कम्युनिस्टांनी हायजॅक केलाय शो

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 1, 2020 11:32 IST

या प्रश्नावरून केबीसीच्या अडचनी वाढण्याची शक्यता आहे. लखनौमधील अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रदेश अध्यक्ष ऋषी कुमार त्रिवेदी यांनी या शोविरोधात तक्रार दाखल केली आहे.

ठळक मुद्देकौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) या कार्यक्रमाचे 12वे पर्व वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या या शोमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावरून सोशल मीडिया ते स्थानिक पातळीपर्यंत वाद सुरू झाला आहे.लखनौमधील अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रदेश अध्यक्ष ऋषी कुमार त्रिवेदी यांनी या शोविरोधात तक्रार दाखल केली आहे.

नवी दिल्ली -कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) या कार्यक्रमाचे 12वे पर्व वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या या शोमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावरून सोशल मीडिया ते स्थानिक पातळीपर्यंत वाद सुरू झाला आहे. 'मनुस्मृती'संदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावरून फिल्म मेकर विवेक अग्निहोत्री यांनी तीव्र प्रतिक्रिया देत, या शोवर कम्युनिस्टांनी कब्जा केल्याचे म्हटले आहे. 

फिल्ममेकर विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात केबीसी 12मध्ये विचारण्यात आलेला एक प्रश्न आहे. शुक्रवारी रात्री प्रसारित झालेल्या कर्मवीर स्पेशल अॅपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी मनुस्मृतीसंदर्भात एक प्रश्न विचारला आहे. हा प्रश्न आहे - "25 डिसेंबर 1927 रोजी डॉ. बी. आर. आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी कोणत्या धर्मग्रंथाच्या प्रती जाळल्या?" यासाठी चार पर्याय देण्यात आले होते - A) विष्णु पुराण B) भगवत गीता C) ऋग्वेद D) मनुस्मृती. यानंतर स्पर्धक मनुस्मृती पर्याय निवडतो आणि त्याचे उत्तर बरोबर येते.

हा व्हिडिओ शेअर करत विवेक अग्निहोत्री यांनी लिहिले आहे, 'केबीसीला कम्युनिस्टांनी हायजॅक केले आहे. इनोसंट मुलांनी हे शिकावे, की कल्चरल वॉर कसे जिंकावे. याला कोडिंग म्हणतात.'  विवेक यांच्या शिवाय अनेक यूझर्सनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. लोकांनी आरोप केला आहे, की या प्रश्नाच्या ऑप्शन्समध्ये केवळ एकाच धर्माच्या धर्मग्रंथांचा उल्लेख केला आहे. हे चूक आहे. या प्रश्नावरून केबीसीच्या अडचनी वाढण्याची शक्यता आहे. लखनौमधील अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रदेश अध्यक्ष ऋषी कुमार त्रिवेदी यांनी या शोविरोधात तक्रार दाखल केली आहे. हा प्रश्न अत्यंत आक्षेपार्ह आणि समाजात जातीय मतभेद निर्माण करणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वीही, केबीसी 11मध्ये काही प्रश्नांवरून आक्षेप नोंदविण्यात आला होता. तेव्हा वाहिनीने यावर माफी मागितली होती. 

टॅग्स :Kaun Banega Crorepatiकौन बनेगा करोडपतीAmitabh Bachchanअमिताभ बच्चनTV Celebritiesटिव्ही कलाकार