शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

अमित शहा आज सोलापूर मुक्कामी; दिल्लीच्या सुरक्षा पथकाने घेतला शासकीय विश्रामगृहाचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 15:02 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा आज सोलापुरात समारोप

ठळक मुद्देशहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहेसभेकरिता येणाºया वाहनांची पार्किंग व्यवस्था जुनी मिल कंपाउंड येथे करण्यात आलीसायंकाळी ४.४0 वाजण्याच्या सुमारास अमित शहा यांचे विमानाने सोलापुरात आगमन होणार

सोलापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौºयानिमित्त दिल्ली येथील सुरक्षा पथकाने शासकीय विश्रामगृह, पार्क स्टेडियमचा ताबा घेतला आहे. शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सर्वत्र कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.

महाजनादेश यात्रेनिमित्त अमित शहा हे रविवारी सोलापूरच्या दौºयावर येत आहेत. सायंकाळी ४.४0 वाजण्याच्या सुमारास अमित शहा यांचे विमानाने सोलापुरात आगमन होणार आहे. ४.४५ वाजता ते सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात येणार आहेत. जुना पुणे नाका येथे येणाºया महाजनादेश यात्रेसाठी जाणार आहेत. तेथून अमित शहा हे पार्क स्टेडियम येथे होणाºया कार्यक्रमाच्या ठिकाणी येणार आहेत.

शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने कार्यक्रम स्थळाची जबाबदारी पोलीस उपायुक्त (गुन्हे) बापू बांगर तर शहरातील बंदोबस्त पोलीस उपायुक्त मधुकर गायकवाड यांच्याकडे आहे. १४ ते १५ पोलीस निरीक्षक, १६ सहायक पोलीस निरीक्षक, २२ फौजदार, पोलीस कर्मचारी, एसआरपीएफची तुकडी, क्युआरटी पथक आदींचा मोठा फौजफाटा लावण्यात आला आहे. 

वाहतूक मार्गात बदल...- रविवारी शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. सरस्वती चौक ते पार्क चौक, लकी चौक ते चार पुतळा, शुभराय आर्ट गॅलरी ते पार्क चौक, डफरीन चौक ते पार्क चौक, मार्केट चौकी ते पार्क चौक या मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली आहे. लकी चौक, सरस्वती चौक ते डफरीन चौकातील वाहतूक रामलाल चौक, महापौर बंगला मार्गे सोडण्यात आली आहे. शुभराय आर्ट गॅलरी ते मार्केट चौकीची वाहतूक नवल पेट्रोलपंप, डफरीन चौक मार्गे सोडण्यात आली आहे. मार्केट चौकी ते पार्क चौकातील वाहतूक दत्त चौक किंवा हरिभाई देवकरण प्रशाला, डफरीन चौक मार्गे देण्यात आली आहे. सभेसाठी तुळजापूर रोड, पुणे रोड, मंगळवेढा रोडकडून सभेकरिता येणाºया वाहनांची पार्किंग व्यवस्था जुनी मिल कंपाउंड येथे करण्यात आली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरAmit Shahअमित शहाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaha Janadesh Yatraमहाजनादेश यात्रा