शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

बिहार निवडणुकीसाठी आंबेडकरांचे एमआयएमसोबत आघाडीचे संकेत

By राजेश शेगोकार | Updated: September 28, 2020 17:02 IST

Bihar Assembly Election 2020 : बिहार निवडणुकीच्या निमित्ताने हे दोन पक्ष एकत्र येण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देबिहारमध्ये मुस्लीम, मागासवर्गीय आणि आदिवासी मिळून ४० टक्के समाज आहे. मुस्लीम समाजाला त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून भावनिक साद घातली आहे.

- राजेश शेगोकार

अकोला : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी रिंगणात उतरणार असून, बिहारचे सामाजिक गणित लक्षात घेता एमआयएमला पुन्हा सोबत घेण्याचे संकेत खुद्द अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनीच दिले आहेत. आंबेडकरांनी केलेल्या आवाहनामध्ये एमआयएम मैत्रीबाबत स्पष्टता नसली तरी महाराष्ट्रत विधानसभा निवडणुकीत आम्ही सोबत येऊ शकलो नाही व परिणाम काय झाले हे समोर आहे, असे स्पष्ट केल्यामुळे बिहारमध्ये ते एमआयएमसारख्या पक्षाशी आघाडी करण्याची शक्यता व्यक्त होत आहेसोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून राजकारणात ‘अकोला पॅटर्न’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाऱ्या अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास प्रत्येक निवडणुकीत नवा प्रयोग केला. गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये एमआयएमसोबत आघाडी करून ‘ओवेसी’ प्रयोग केला;मात्र औरंगाबादची एकमेव जागा वगळता कुठेही यश मिळाले नाही. खुद्द अ‍ॅड. आंबेडकर हे सुद्धा दोन ठिकाणी पराभूत झाले. संख्यात्मकदृष्ट्या या प्रयोगाला यशाची फळे मिळाली नसली तरी या दोन पक्षाच्या आघाडीमुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाची गणिते पूर्णत: बिघडली व वंचितचे उपद्रव मूल्य अधोरेखित झाले. विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून या दोन पक्षात बिनसले अन् दोन्ही पक्षांची मैत्री तुटली. आता बिहार निवडणुकीच्या निमित्ताने हे दोन पक्ष एकत्र येण्याची चिन्हे आहेत.

जे महाराष्ट्रात घडले नाही ते बिहारमध्ये घडवून आणू. एनडीएच्या सरकारला बिहारमध्ये पराभूत करणे हाच एकमेव उद्देश असल्याचे आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे. बिहारमध्ये मुस्लीम, मागासवर्गीय आणि आदिवासी मिळून ४० टक्के समाज आहे. यांची मोट बांधण्याचा त्यांचा प्रयत्न असून, त्या करिता मुस्लीम समाजाला त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून भावनिक साद घातली आहे. या सादेला कसा प्रतिसाद मिळतो, यावरच आंबेडकरांच्या बिहार निवडणुकीच्या प्रयोगाचे भवितव्य ठरणार आहे. त्यांनी यापूर्वी तामिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश येथेही पक्षाचे उमेदवार उभे केले होते. त्यामध्ये तामिळनाडूमध्ये एक आमदार विजयी झाले होते, हे विशेष. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी व एमआयएमच्या मैत्रीचा थांबलेला प्रवास बिहार निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा सुरू होण्याची चिन्हे आहेत. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPoliticsराजकारणAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक 2020