शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
4
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
5
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
6
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
7
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
8
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
9
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
10
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
11
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
12
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
13
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
16
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
17
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
18
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
19
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
20
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?

आंबेडकरांनी दिले स्वबळावर लढण्याचे संकेत !

By admin | Updated: January 14, 2017 00:48 IST

सुधारणांसाठी संधी; अकोला मनपाच्या सर्वच जागा लढण्याची तयारी.

अकोला, दि. १३- महानगरपालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षासोबत युती किंवा आघाडी करण्याचा भारिप-बहुजन महासंघाचा अद्याप निर्णय झाला नसून, महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या नावावर भारिप-बमसं स्वबळावर अकोला महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहे, असे संकेत भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे दिले. महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहर सुधारणांसाठी मतदारांना संधी उपलब्ध झाल्याचे सांगत, या निवडणुकीत सर्वच जागा लढण्याची पक्षाची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.महानगरपालिका निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर पक्षाच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेण्यासाठी अकोल्यात आले असता, ह्यलोकमतह्णसोबत ते बोलत होते. मनपा निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षासोबत युती-आघाडी करण्याचा निर्णय भारिप-बमसंने अद्याप घेतला नाही. त्यामुळे कोणाशीही युती व आघाडी न करता मनपाच्या सर्वच जागा स्वबळावर लढण्याची पक्षाची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. अकोला शहरात मूलभूत सोयी-सुविधांच्या दृष्टीने सुधारणा झाल्या पाहिजे, असे मतदारांना वाटत असेल, तर मनपा निवडणुकीच्या माध्यमातून शहरातील मतदारांना ही संधी आली आहे. शहर विकासाच्या दृष्टीने शहरातील मतदारांनी या निवडणुकीत निर्णय घेतला पाहिजे, असे अँड. आंबेडकर यांनी सांगितले.वॉर्डा-वॉर्डातून कार्यकर्त्यांनी सुचविलेल्या उमेदवारांना प्राधान्य!मनपा निवडणुकीत भारिप-बहुजन महासंघाची उमेदवारी देताना, शहरातील वॉर्डा-वॉर्डातून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुचविलेल्या इच्छुक उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामध्ये संबंधित इच्छुक उमेदवारांच्या कार्याची पडताळणी केल्यानंतरच उमेदवारी निश्‍चित करण्यात येणार असल्याचे अँड.आंबेडकर यांनी स्पष्ट केले.उपसमिती करणार उमेदवारांची निवड !मनपा निवडणुकीसाठी भारिप-बमसंने निवडणूक निरीक्षक उपसमिती गठित करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारुन पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची निवड या उपसमितीकडून करण्यात येणार असल्याचेही अँड.आंबेडकर यांनी सांगितले.कार्यकर्ता जगला पाहिजे; युती-आघाडी नकोच !पक्षासाठी काम करणारा कार्यकर्ता जगला पाहिजे, त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची युती किंवा आघाडी नसावीच, असे मत अँड.आंबेडकर यांनी व्यक्त केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती -आघाडी न केल्यास पक्षातील कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त न्याय देणे शक्य होते, अशी आपली भूमिका असून, पक्षासाठी काम करणारा कार्यकर्ता जगणे महत्त्वाचे आहे, असेही अँड.आंबेडकरांनी सांगितले.