शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

आंबोली धबधब्याच्या नामकरणाच्या हालचाली, धबधबा अडकला सीमावादात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 19:42 IST

जगाच्या नकाशावर आलेल्या निसर्ग संपदेनं परिपूर्ण असलेल्या आंबोलीचा धबधबा सीमेच्या वादात अडकला आहे. आंबोली आणि पारपोली या दोन्ही ग्रामपंचायतींनी आंबोली धबधब्यावर दावा केला आहे.

सावंतवाडी, दि. 13 - जगाच्या नकाशावर आलेल्या निसर्ग संपदेनं परिपूर्ण असलेल्या आंबोलीचा धबधबा सीमेच्या वादात अडकला आहे. आंबोली आणि पारपोली या दोन्ही ग्रामपंचायतींनी आंबोली धबधब्यावर दावा केला आहे. आंबोली हा धबधबा पारपोली गावाच्या हद्दीत येत असल्यानं त्याच्या नामकरणाच्या हालचालींना वेग आला आहे. आंबोलीच्या नामकरणासाठी पारपोलीवासीय आणि वनविभागामध्ये गुप्त बैठकाही सुरू आहेत. आंबोलीचं नामकरण करण्याला आंबोलीवासीयांचा विरोध आहे. आंबोली घाट व वर्षा पर्यटनाला मुख्य आंबोलीच्या धबधब्यामुळे वरदान लाभलं आहे. या धबधब्यावर दिवसाकाठी हजारो पर्यटक येतात; निसर्ग संपदेनं तृप्त असलेला हा धबधबा सीमेच्या वादात फसला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आंबोलीचा विकास व्हावा, यासाठी आंबोली धबधब्याला भेट देणार्‍या पर्यटकांकडून प्रत्येकी 10 रुपये पर्यटन कर आकारण्याचा निर्णय घेतला होता. तसेच त्याची अंमलबजावणीसुद्धा करण्यात आली. आतापर्यंत वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून समितीकडे दहा लाखांहून अधिकची रक्कम कराच्या स्वरुपात गोळा झालेली आहे. येत्या काळात या रकमेत वाढ होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.कराच्या माध्यमातून मिळणारे लाखो रुपये हाच कळीचा मुद्दा ठरला असून, पारपोली ग्रामपंचायतीला धबधब्याचं नामकरण करायचं आहे. पर्यटनातून मिळणा-या कराच्या उत्पन्नावर आता पारपोली आणि आंबोली या दोन्ही ग्रामपंचायतींचा डोळा आहे. त्यामुळे ते उत्पन्न आपल्यालाच मिळावे, यासाठी दोन्ही ग्रामपंचायती प्रयत्नशील आहेत. वनविभाग आणि महसूल विभागाने कागदपत्रांच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार आंबोली धबधबा हा पारपोली गावच्या हद्दीत येत असल्यामुळे त्याची देखरेख आणि मिळणारे उत्पन्न आमच्या ग्रामपंचायतीला देण्यात यावे, अशी मागणी पारपोली ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. आंबोली धबधब्याचे नामकरण ‘शिवमुख धबधबा पारपोली’ असे करण्याचाही पारपोली ग्रामपंचायतीचा प्रयत्न आहे. त्यासाठी ग्रामस्थ आणि वनविभागाच्या गोपनीय बैठका होतायत.आचारसंहितेमुळे त्यांना उघड कोणतीही भूमिका घेता येत नाही. नामकरणाला आंबोली आणि चौकुळ ग्रामस्थांनी विरोध केला आहे. तसेच इतकी वर्षे हा आंबोली धबधबा या नावानेच ओळखला जात असल्यामुळे काहीही झाले तरी आम्ही त्याचे नाव बदलण्यास देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतलीय. मात्र दोन गावांत वाद लावण्यासाठी वन विभागाचे अधिकारीच जबाबदार आहेत, असा आरोपही आंबोली चौकूळ ग्रामस्थांनी केला आहे. विद्यमान उपसरपंच धबधब्याच्या ठिकाणी करवसुली करण्यासाठी नेमण्यात आलेल्या पथकात बसतात ते लोकप्रतिनिधी असल्यामुळे असा प्रकार करू शकत नाहीत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.