शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

‘अमंगळ’वार, २१ ठार; राज्यभरात एकाच दिवशी अनेक अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 06:21 IST

बुलढाण्यात एसटी-कंटेनरची धडक; अमरावतीत कुटुंबावर काळाचा घाला 

लाेकमत न्यूज नेटवर्क सिंदखेड राजा (जि. बुलढाणा) : एसटी बस आणि कंटेनरमध्ये समोरासमोर धडक होऊन बसमधील चार प्रवाशांसह कंटेनरचालक व बसचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नागपूर-छत्रपती संभाजीनगर मार्गावर सिंदखेड राजा तालुक्यातील पळखेड चक्का गावानजीक मंगळवारी घडली. जखणी २८ प्रवाशांवर उपचार सुरु आहेत. 

मेहकर आगाराची बस ही पिंपरी चिंचवड येथून मेहकरकडे जात होती, तर नागपूरकडून येणारा कंटेनर हा जालन्याकडे जात होता. सिंदखेड राजा शहरापासून आठ किमी अंतरावर असलेल्या पळसखेड चक्का गावनजीक बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस समोरून येणाऱ्या कंटेनरवर जाऊन धडकली. 

अमरावतीमध्ये भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत टेम्पोमधील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. दर्यापूर ते अंजनगाव मार्गावरील इटकी फाट्याजवळ सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. मृतांमध्ये तरुण पती-पत्नी, त्यांची नऊवर्षीय मुलगी, आई व पुतण्याचा समावेश आहे. या अपघातात त्याच कुटुंबातील आठ जण जखमी झाले आहेत. 

घाटात पिकअप कोसळून चार ठारतळोदा (जि. नंदुरबार) : धडगाव ते तळोदा रस्त्यावर चांदसैली घाटात पिकअप वाहनाला अपघात होऊन चाैघे ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. अपघातात तिघे जखमी झाले असून, यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. धडगाव तालुक्यातील वावी येथील तुकाराम दिवाल्या ठाकरे हे गावातील काहींसोबत घरासाठी लागणारे काैल आणि पत्रे घेण्यासाठी पिकअपने तळोदा येथे येत होते. 

कंटेनर ६ गाड्यांवर आदळला; १ ठारखोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सोमवारी रात्री ११.१५ च्या   सुमारास एका कंटेनरचे अचानक ब्रेक फेल झाले. या कंटेनरने तब्बल सहा गाड्यांना भीषण धडक दिली. या अपघातात एक ठार, तर पाच जण जखमी झाले. सुभाष पंढरीनाथ चौगुले (४५, रा.वाशी, नवी मुंबई) असे अपघातातील मृताचे नाव आहे. 

‘समृद्धी’वर अपघात, १ ठारसिंदखेडराजा (जि. बुलढाणा) : समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका सुरूच असून, मंगळवारी पहाटे २:१५ वाजता खासगी प्रवासी बस दुभाजकाला धडकली. यात बसच्या क्लीनरचा मृत्यू झाला असून, ८ प्रवासी जखमी झाले आहेत. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडल्याचे महामार्ग पोलिसांचे म्हणणे आहे.

दुचाकी-जीपच्या अपघातात पिता-पुत्र ठारगंगाखेड (जि. परभणी) : गंगाखेड तालुक्यातील मरडसगाव परिसरात राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी व जीपचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील पिता-पुत्र जागीच ठार झाले. ही घटना सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. 

अंत्यविधीहून परतताना अपघात, दोन ठारवडकी (जि.यवतमाळ) : अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दोन जण ठार झाले. ही घटना मंगळवारी दुपारी कारेगाव पुलाजवळ घडली. दत्तूजी ननकटे (रा.सिंधी मेघे, जि.वर्धा) व फकीरचंद बुरबादे (रा.सालोड, जि.वर्धा) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही मारेगाव तालुक्यातील मार्डी येथून नातेवाइकाचा अंत्यविधी आटोपून दुचाकीने आपल्या गावी जात होते.

टॅग्स :Accidentअपघात